2 तासांत 12 हजार रुपयांनी महाग झाली चांदी, सोन्याच्या दरात वाढ, 22-18 कॅरेटचे दर काय?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
इराण इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर MCX वर सोन्या चांदीच्या किमतीत मोठी उसळी, २५ मार्चला आणि पुढे २ एप्रिल ५ मे एक्सपायरीत दर झपाट्याने वाढले.
इराण इस्रायल युद्धाचा फटका आंतरराष्ट्रीय मार्केट आणि सोन्या चांदीला बसला आहे. मात्र असं असतानाही युद्धात इतके दिवसांपासून सोन्या चांदीचे दर घसरत होते. या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. आज चक्क दोन तासांत सोन्या चांदीचे दर इतक्या वेगानं वाढले की सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.
आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी, म्हणजेच २५ मार्च रोजी बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली. मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचे भाव ५,४०० रुपयांनी वधारले आहेत, तर चांदीने तब्बल १२ हजार रुपयांनी वधारल्याचं पाहायला मिळालं. जागतिक बाजारातील घडामोडींमुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा एकदा सोन्याकडे आपला मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.
MCX वर सोन्या-चांदीचा धमाका
बुधवारी सकाळी बाजार उघडतानाच २ एप्रिलच्या एक्सपायरीचे सोने ३.९० टक्क्यांच्या वाढीसह १,४४,३२५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. मंगळवारी बाजार बंद होताना सोने १,३८,९१२ रुपयांवर होते, म्हणजेच एकाच दिवसात यात मोठी रिकव्हरी झाली आहे.
advertisement
दुसरीकडे, ५ मे च्या एक्सपायरीची चांदी ५.५६ टक्क्यांनी वधारून २,३६,४०० रुपये प्रति किलोवर ट्रेड करत आहे. चांदीच्या दरात एकाच दिवसात साधारण १२,४५० रुपयांची वाढ झाल्याने दागिने खरेदीदारांच्या चिंतेत भर पडली आहे.
का वाढले अचानक भाव?
अमेरिकन राजनैतिक अधिकारी इरानसोबतचे युद्ध संपवण्यासाठी प्रयत्न करत असून, महिनाभराच्या 'सीझफायर'ची (युद्धविराम) शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बातमीमुळे जागतिक बाजारात सोन्याची मागणी वाढली.
advertisement
अमेरिकन डॉलरचा निर्देशांक काहीसा खाली आल्याने इतर चलनांमध्ये सोने खरेदी स्वस्त झाली, परिणामी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली. तेलाच्या किमती कमी झाल्यामुळे महागाई वाढण्याची भीती काहीशी कमी झाली आहे, ज्याचा सकारात्मक परिणाम मौल्यवान धातूंवर झाला आहे.
| शहर | २४ कॅरेट (सोने) | २२ कॅरेट (सोने) | १८ कॅरेट |
| मुंबई | १,४६,६७० रुपये | १,३४,४५० रुपये | १,१०,०१० रुपये |
| पुणे | १,४६,६७० रुपये | १,३४,४५० रुपये | १,१०,०१० रुपये |
| दिल्ली | १,४६,८२० रुपये | १,३४,६०० रुपये | १,१०,१६० रुपये |
| अहमदाबाद | १,४६,७२० रुपये | १,३४,५०० रुपये | १,१०,०६० रुपये |
advertisement
सध्या मुंबई आणि दिल्लीत १० ग्रॅम चांदी २,५०० रुपयांच्या दराने विकली जात असून, १०० ग्रॅमसाठी ग्राहकांना २५,००० रुपये मोजावे लागत आहेत. गेल्या काही दिवसांत ५५ हजार रुपयांपर्यंत पडलेली चांदी आता पुन्हा सावरताना दिसत आहे. लग्नसराईच्या काळात दरात झालेली ही वाढ ग्राहकांसाठी मात्र झटका ठरू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 25, 2026 11:48 AM IST
मराठी बातम्या/मनी/
2 तासांत 12 हजार रुपयांनी महाग झाली चांदी, सोन्याच्या दरात वाढ, 22-18 कॅरेटचे दर काय?









