Rule Change : रेल्वे तिकिट बुकिंगमध्ये मोठा बदल, 1 ऑक्टोबरपासून फक्त 'या' लोकांना देणार प्राधान्य
- Published by:Devika Shinde
Last Updated:
आता इंडियन रेल्वे (IRCTC) तिकिट बुकिंगसाठी नवीन नियम लागू करत आहे, ज्यामुळे ऑनलाइन तिकिट बुकिंग अधिक पारदर्शक होईल आणि तिकीट दलालांचा गैरवापर कमी होईल.
मुंबई : सध्या दिवाळी आणि छठ सारख्या सणांच्या काळात लाखो लोक घराला जातात. याकाळात लोक फिरायला देखील मोठ्या प्रमाणात जातात, त्यामुळे हा सिजनचा काळ म्हणून देखील ओळखला जाते. अशा वेळेस ट्रेन तिकिट बुक करणं नेहमीच कठीण असतं. आता इंडियन रेल्वे (IRCTC) तिकिट बुकिंगसाठी नवीन नियम लागू करत आहे, ज्यामुळे ऑनलाइन तिकिट बुकिंग अधिक पारदर्शक होईल आणि तिकीट दलालांचा गैरवापर कमी होईल.
1 ऑक्टोबरपासून काय बदलणार?
सध्या हा नियम फक्त तत्काळ तिकिटांसाठी लागू होता, पण आता जनरल रिजर्वेशन तिकिटांवरही लागू होणार आहे.
तिकिट बुकिंग खुलते तेव्हा पहिले 15 मिनिट फक्त आधार वेरिफाइड अकाउंट असलेल्या युजर्ससाठी उपलब्ध राहील.
IRCTC वेबसाइट आणि अॅपवर या नियमाचा सरळ प्रभाव आहे.
कंप्यूटरीकृत PRS काउंटरवर तिकिट घेणाऱ्यांसाठी वेळ किंवा प्रक्रिया पूर्वीसारखीच राहील.
advertisement
याचा अर्थ असा की, पहिले 15 मिनिट फक्त आधार वेरिफाइड अकाउंटधारकांना बुकिंग करता येईल, इतर युजर्सना प्रतीक्षा करावी लागेल.
या नियमामागचे कारण काय?
रेल्वेचा मुख्य उद्देश तिकिट दलाली रोखणे आणि तिकिट प्रत्यक्ष प्रवाशांपर्यंत पोहोचवणे हा आहे. आधार अॅथेंटिफिकेशन केलेल्या युजर्सना प्रथम बुकिंगची सुविधा देऊन थोक बुकिंग आणि तिकिट दलालांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
advertisement
यामुळे तिकिट वितरण अधिक पारदर्शक होते आणि योग्य प्रवाशांना सुविधा मिळते.
रेल्वेचा आदेश काय आहे?
रेल्वे बोर्डाने सांगितले की, आरक्षित प्रणालीचा लाभ सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत पोहोचायला हवा, तसेच तिकिट दलालांचा गैरवापर टाळावा. 1 ऑक्टोबरपासून जनरल रिजर्वेशन खुलते तेव्हा पहिले 15 मिनिट फक्त आधार वेरिफाइड युजर्सना IRCTC वेबसाइट किंवा अॅपवरून बुकिंग करता येईल.
advertisement
तत्काळ तिकिटांवर आधीच लागू
गौरतलब की, 1 जुलै 2025 पासून तत्काळ तिकिटांसाठी आधार वेरिफिकेशन आवश्यक करण्यात आले आहे. या नियमाचा उद्देशही तिकिट बुकिंग अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करणे हा आहे.
सणांच्या काळात घरी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही बदललेली प्रणाली सोयीची ठरणार आहे. फक्त आधार वेरिफाइड अकाउंटधारकांना सुरुवातीला बुकिंग मिळणार असल्यामुळे तिकिट दलाली आणि थोक बुकिंगवर नियंत्रण राहणार आहे, तसेच प्रवाशांना अधिक सुगम प्रवासासाठी मदत होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 28, 2025 7:01 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Rule Change : रेल्वे तिकिट बुकिंगमध्ये मोठा बदल, 1 ऑक्टोबरपासून फक्त 'या' लोकांना देणार प्राधान्य