लाडक्या बहिणीचा दिल्लीत डंका! महाराष्ट्रासारखंच दिल्लीतल्या महिलांना मिळणार 2100 रुपये
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
आता महिलांच्या खात्यावर हजारच रुपये येणार आहेत. महाराष्ट्रात ही योजना यशस्वी झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी देखील मोठी घोषणा केली आहे.
मुंबई: महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना यशस्वी ठरली आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे. प्रत्येक महिन्याला खात्यावर २१०० रुपये येणार आहेत. पण त्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागणार आहे. आता महिलांच्या खात्यावर हजारच रुपये येणार आहेत. महाराष्ट्रात ही योजना यशस्वी झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी देखील मोठी घोषणा केली आहे.
आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी एक मोठी घोषणा केली आहे. दिल्ली सरकारने आपले आश्वासन पूर्ण केले असून महिला सन्मान निधी योजनेला मंजुरी दिल्याचे सांगितले. माझ्या बहिणी आणि दिल्लीच्या मातांसाठी आहेत. दिल्लीतील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दर महिन्याला हजार रुपये जमा होतील. निवडणुकीनंतर महिलांना २१०० रुपये मिळणार आहेत.
advertisement
आज दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. राजधानीतील १८ वर्षांवरील सर्व महिलांच्या खात्यात दर महिन्याला ही रक्कम येईल. यासाठी महिलांना अर्ज करावा लागेल, शिवाय कागदपत्रेही जमा करावी लागणार आहेत. त्यानंतरच अर्जाची छाननी होईल आणि महिलांच्या खात्यावर हजार रुपये जमा होतील अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
advertisement
या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना उद्यापासून अर्ज भरता येणार आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर महिलांना १००० रुपयांऐवजी २१०० रुपये महिन्याला मिळतील अशी घोषणा केजरीवाल यांनी केली. महिला त्यांचे कुटुंब चालवतात, मुलांवर चांगले संस्कार करतात आणि त्यांचे संगोपन करतात. या कामात आपण त्यांना थोडी मदत करू शकलो तर आपण स्वतःला भाग्यवान समजतो.
advertisement
महाराष्ट्राप्रमाणेच केजरीवाल यांच्यासाठी ही योजना गेमचेंजर ठरणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रात महायुतीला मोठ्या मताधिक्याने विजय मिळवता आला. तोच फंडा आता केजरीवाल दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी वापरणार का? भाजप आता काय योजना आणणार हे पाहावे लागणार आहे.
Location :
Delhi,Delhi,Delhi
First Published :
December 12, 2024 2:29 PM IST
मराठी बातम्या/मनी/
लाडक्या बहिणीचा दिल्लीत डंका! महाराष्ट्रासारखंच दिल्लीतल्या महिलांना मिळणार 2100 रुपये