पोस्टाची ही विमा पॉलिसी आहे भारी! वर्षाला फक्त 396 रुपये खर्च आणि Emergency मध्ये मिळणार 10 लाखांचा लाभ

Last Updated:

या विमा पॉलिसीचा लाभ 18 वर्षे वयाच्या तरुणांपासून ते 65 वर्षांपर्यंतचे वृद्धही घेऊ शकतात. यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास, अंशतः अपंगत्व आल्यास किंवा अर्धांगवायू झाल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचा क्लेम दिला जाईल.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
राहुल दवे, प्रतिनिधी
इंदूर : अनेक प्रकारच्या विमा पॉलिसीच्या माध्यमातून लोक आपले आयुष्य आणि कुटुंब सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतात. पण त्यातच असे आणखी काही लोक आहेत, जे महागाईच्या या काळात विमा पॉलिसीचा लाभ घेऊ शकत नाहीत. अशा लोकांना दुर्दैवाने काही अपघातानंतर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.  म्हणून अशा लोकांसाठी भारतीय टपाल विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने एक अत्यंत चांगली योजना सुरू केली आहे. अत्यंत फायदेशीर अपघात विमा पॉलिसीची ही सुविधा प्रति वर्ष फक्त 396 रुपयांमध्ये प्रदान केली जात आहे.
advertisement
या विमा पॉलिसीचा लाभ 18 वर्षे वयाच्या तरुणांपासून ते 65 वर्षांपर्यंतचे वृद्धही घेऊ शकतात. यामध्ये कोणत्याही व्यक्तीचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास, अंशतः अपंगत्व आल्यास किंवा अर्धांगवायू झाल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचा क्लेम दिला जाईल. तर अपघात झाल्यास रुग्णालयात दाखल झालेल्या विमाधारकाला प्रदान केले जाईल. आयपीडी उपचारांच्या खर्चासाठी 60 हजार रुपयांपर्यंतचा क्लेम आणि ओपीडीमध्ये ड्रेसिंग किंवा उपचारासाठी 30 हजार रुपये दिले जातील.
advertisement
या विमा पॉलिसी धारक व्यक्तीला दुर्घटनाग्रस्त झाल्यावर रुग्णालयात दाखल होण्याच्या स्थितीमध्ये 60 हजार रुपयांव्यतिरिक्त 10 दिवसांपर्यंत एक हजार रुपयेसुद्धा वेगळे प्रतिदिवस दिले जातील. जर विमाधारकाचे कुटुंब किंवा कुणी शहरात राहत असेल तर त्याला येण्याजाण्यासाठीही जास्तीत जास्त 25 हजार रुपयांपर्यंतचा तिकिट खर्च दिला जाईल.
दुर्दैवाने, विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंतिम संस्कारासाठी 5,000 रुपये देण्याची तरतूद या पॉलिसीमध्ये आहे. यासोबतच पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, 10 लाख रुपयांच्या विमा रकमेव्यतिरिक्त, मुलांच्या शिक्षणासाठी स्वतंत्रपणे 1 लाख रुपये देण्याची तरतूद आहे.
advertisement
याठिकाणी मिळणार सुविधा
ही सुविधा इंदूर येथील जीपीओ पोस्ट ऑफिस यासोबतच इंदूरमधील कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन किंवा तुमच्या घरी येणाऱ्या पोस्टमनलासुद्धा तुम्ही या विमा योजनेबाबत संपूर्ण माहिती विचारू शकतात. यासोबतच अधिक माहितीसाठी तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेच्या अधिकाऱ्याशी संपर्क साधू शकता.
advertisement
खात्याविनाही मिळणार लाभ -
पोस्ट पेमेंट बँकेचे अधिकारी सचिन टेलर यांनी सांगितले की, या दुर्घटना विमा योजनेचा लाभ घेणय्साठी तुमचे पोस्ट बँकेत खाते असणे आवश्यक नाही. तसेच तुमचे खाते नसेल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सध्या या योजनेचा लाभ अनेक जण घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या/मनी/
पोस्टाची ही विमा पॉलिसी आहे भारी! वर्षाला फक्त 396 रुपये खर्च आणि Emergency मध्ये मिळणार 10 लाखांचा लाभ
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement