Ladki Bahin Yojana : e-KYC केलीच नाही तर योजनेचा लाभ बंद होणार? आदिती तटकरेंनी सगळंच सांगितलं

Last Updated:

जर ई केवायसी केलीच नाही तर लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार का?असा सवाल अनेक महिलांना पडला होता. यावर आता महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींच्या सगळ्यांच शंका दुर केल्या आहेत.

Ladki Bahin Yojana e-KYC
Ladki Bahin Yojana e-KYC
Ladki Bahin Yojana e-KYC: नागपूर : महाराष्ट्राची महत्वाकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठी अपडेट समोर आली आहे.या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि गैरप्रकार तसेच घुसखोरी रोखण्यासाठी पात्र महिला लाभार्थ्यांना ई केवायसी बंधनकारक करण्यात आले आहे.पण जर ई केवायसी केलीच नाही तर लाडकी बहिण योजनेचा लाभ मिळणार का?असा सवाल अनेक महिलांना पडला होता. यावर आता महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींच्या सगळ्यांच शंका दुर केल्या आहेत.
लाडकी बहीण योजनच्या ई केवायसीवर बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, या काही नव्या गाईडलाईन्स नाही आहेत.शासनाच्या 91 योजनेमध्ये ई केवायसी करण्यात येते. ऑथोरायझेशनसाठी 118 बाबींची पूर्तता करावी लागते. ऑथोरायझेशन मिळण्याची प्रक्रिया आठ नऊ महिन्यापासून सुरू केली होती आणि ती मिळाल्यावर ही केवायसी ची प्रक्रिया सुरू केली आहे, असे त्यांनी सांगितले.
advertisement
लाडकी बहिण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांचा ई केवायसी झाल्यावर त्यांना नियमित लाभ मिळणार आहे, असे देखील आदिती तटकरे यांनी सांगितले.यामुळे एक महिन्याची मिळालं नंतर विलंब झाला या सगळ्यत सुलभता येणार असल्याचेही आदिती तटकरे म्हणाल्या आहेत.लाभार्थ्यांनाही ई केवायसी करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून केवळ लाडकी बहीणच नाही तर शासनाच्या इतरही योजनांचा लाभ मिळेल.
advertisement
एकदा ई केवायसी झालं तर पुढल्या काही योजना आल्या तर त्यासाठी ई केवायसी करावे लागणार नाही. इतर सरकारी विभागांकडून आम्ही डेटा मागवला आहे आणि त्यानुसार तो इंटिग्रेट करावा लागतो. आता जे लाभार्थी आहेत त्यापैकी 50 लाख लाभार्थ्यांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नव्हते,असे देखील तटकरे म्हणाल्या आहेत.
महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, "योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी वेब पोर्टलवर (https://ladakibahin.maharashtra.gov.in/) उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यांना पुढील दोन महिन्यांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंती करण्यात येत आहे.
advertisement
ई-केवायसीची प्रक्रिया:
सर्व प्रथम ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
पोर्टलवर लॉगिन करून तुमचे आधार कार्ड आणि इतर माहिती भरा.
तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल.
तो ओटीपी टाकून तुमची ओळख सत्यापित करा.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेमुळे केवळ पात्र आणि गरजू महिलाच योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील. त्यामुळे ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे, त्यांनी तातडीने पुढील दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा, त्यांना मिळणारा सन्मान निधी बंद होण्याची शक्यता आहे. ही मुदत केवळ दोन महिन्यांची असून, यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही, यावर सरकारने भर दिला आहे.
मराठी बातम्या/मनी/
Ladki Bahin Yojana : e-KYC केलीच नाही तर योजनेचा लाभ बंद होणार? आदिती तटकरेंनी सगळंच सांगितलं
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement