Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, ऑक्टोबरचा हफ्ता खात्यात जमा होणार, तारीख आली समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात
मुंबई: महायुती सरकारसाठी संजीवनी ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आता KYC आणि इतर तांत्रिक बाबींमध्ये अडकली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीचा हफ्ता कधी येणार याकडे महाराष्ट्रातील महिलांचं लक्ष लागून होतं. पण, आता प्रतिक्षा संपली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा हफ्ता 4 नोव्हेंबरपासून खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती खुद्द महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.
महायुती सरकारची लोकप्रिय योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सध्या KYC च्या प्रक्रियेमध्ये अडकली आहे. लाखो लाडक्या बहिणींना आता KYC प्रक्रियेतून जावं लागत आहे. या दरम्यान अनेक बहिणी या अपात्र झाल्या आहेत. पण आता ऑक्टोबर महिन्याचा हफ्ता कधी वितरीत होणार याची माहिती आदिती तटकरेंनी दिली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑक्टोबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे, अशी माहिती आदिती तटकरेंनी दिली.
advertisement
'E-KYC लवकर करा'
तसंच, महाराष्ट्रातील माता-भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर E-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व लाडक्या बहिणींनी 18 नोव्हेंबरचा आधी E-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, असं आवाहनही तटकरेंनी केलं.
advertisement
KYC कधी पर्यंत करायचं?
view commentsदरम्यान, लाडकी बहिण योजनेसाठी KYC अनिवार्य केली आहे. पण मधल्या काळात KYC करत असताना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. E-KYC करताना OTP चं येत नसल्याचं उघड झालं होतं. अनेक महिलांनी याबद्दल तक्रार केली होती. त्यानंतर आदिती तटकरे यांना याची दखल घेतली. तांत्रिक अडचण दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ आणि सुकर करण्यात आली आहे. आता १९ नोव्हेंबरपर्यंत KYC करणे बंधनकारक असणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 03, 2025 8:03 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मोठा दिलासा, ऑक्टोबरचा हफ्ता खात्यात जमा होणार, तारीख आली समोर


