LIC एजंटला किती मिळतो पगार? कंपनीनेच दिली माहिती
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
काही वेळा एखाद्या कुटुंबातल्या अनेक पिढ्या एकाच एजंटकडून विमा घेतात. त्यामुळे एलआयसी हा एक सर्वोत्तम भारतीय ब्रॅंड ठरतो.
भारतातील आयुर्विमा क्षेत्राचा कणा अशी ‘एलआयसी’ ची ओळख आहे. एलआयसी एजंटला किती पगार असेल याबाबत अनेक लोक तर्कवितर्क लढवत असतात. काही जण लाखात तर काही जण हजारांमध्ये कमावतात अशी चर्चा असते. पण खरं काय ते आपल्याला एलआयसीच सांगू शकते. नुकतीच कंपनीने याबाबतची माहिती जगजाहीर केली आहे. देशाच्या विविध भागांमध्ये एलआयसी एजंटला मिळणारा पगार वेगळा आहे. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील एजंट्सच्या पगारात बरीच तफावतही आहे. विशेष म्हणजे एजंट काम करत असलेल्या राज्याची किंवा क्षेत्राची आर्थिक स्थिती, लोकसंख्या आणि त्या एजंटचं काम अशा विविध गोष्टींनुसार एखाद्या एजंटचा पगार ठरत असतो.
हिमाचल प्रदेशात एलआयसी एजंटला सर्वात कमी
म्हणजे मासिक सुमारे 10,328 रुपये पगार आहे. अंदमान निकोबारमधील एजंट्सना मासिक सुमारे 20,446 रुपये पगार आहे. अंदमान निकोबारमध्ये एलआयसी एजंट्सची संख्याही खूप कमी म्हणजे साधारण 273 आहे. हिमाचल प्रदेशात सुमारे 12,731 एजंट आहेत. जास्त एजंट्स म्हणजे जास्त स्पर्धा आणि कमी वेतन.
एलआयसी ही भारतातील एक महत्त्वाची आणि प्रचंड मोठी संस्था आहे. देशभर तिचे सुमारे 13,90,000 एजंट्स आहेत. उत्तर प्रदेशात एलआयसीचे 1.84 लाख एजंट आहेत. त्यांचा मासिक पगार सुमारे 11,887 रुपये आहे. महाराष्ट्रात 1.61 लाखांहून अधिक एजंट्स आहेत. त्यांचा मासिक पगार सुमारे 14,931 रुपये आहे. पश्चिम बंगालमध्ये 1.19 लाख एजंट असून त्यांचं मासिक वेतन सुमारे 13,512 रुपये आहे. तमिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश आणि दिल्ली एनसीआरमध्ये एजंट्सची संख्या भरपूर आहे, मात्र त्यांचं मासिक वेतन या राज्यांच्या तुलनेत थोडं कमी आहे.
advertisement
बहुतेक एलआयसी एजंट्स कमिशनवर काम करतात. जेवढ्या जास्त पॉलिसी तेवढा जास्त मोबदला. त्यामुळे ग्राहकांशी चांगले संबंध ठेवणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. एलआयसीकडून त्यांना सातत्याने ट्रेनिंगही दिलं जातं. मासिक पगाराव्यतिरिक्त ग्रॅच्युटी, बोनस पेन्शन असे लाभही त्यांना मिळतात. त्यामुळे एलआयसी एजंटची आर्थिक बाजू चांगली होते. त्यांना समाजात मानसन्मान असतो. लोकांचा त्यांच्यावर विश्वास असतो. काही वेळा एखाद्या कुटुंबातल्या अनेक पिढ्या एकाच एजंटकडून विमा घेतात. त्यामुळे एलआयसी हा एक सर्वोत्तम भारतीय ब्रॅंड ठरतो.
advertisement
एलआयसी एजंट होण्यासाठी ग्रामीण भागात किमान दहावी तर शहरी भागात किमान बारावी पास असणं आवश्यक आहे. जवळच्या एलआयसी कार्यालयात जाऊन डेव्हलपमेंटल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. 25 तासांचं आयआरडीएआय ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर एक परीक्षा असते. ती पास झाल्यानंतर ती व्यक्ती एलआयसीमध्ये नोंदणी करुन एजंट होऊ शकते. एजंटची मिळकत ही कमिशन स्वरुपातील असते. चांगलं काम करणाऱ्या एजंट्सना प्रमोशनच्या संधीही मिळतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 23, 2024 11:37 AM IST