Bima Sakhi Yojana: पीएम मोदी आज लाडक्या बहिणींना देणार गिफ्ट, नेमकी काय आहे योजना?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
LIC Bima Sakhi Yojana: पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. पीएम किसान सारखंच ही योजना देखील पीएम मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असल्याचं म्हटलं जात आहे.
लाडकी बहीण महाराष्ट्रातील योजना सुपरहिट ठरली. त्याच पार्श्वभूमीवर इतर राज्यांमध्ये देखील लाडकी बहीण सारख्या योजना राबवण्यात आल्या आहेत. आता केंद्र सरकार या लाडक्या बहिणींना आज मोठं गिफ्ट देणार आहे. बिमा सखी योजना आजपासून सुरू होणार आहे. पीएम नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ केला जाणार आहे. पीएम किसान सारखंच ही योजना देखील पीएम मोदी यांचा ड्रिम प्रोजेक्ट असल्याचं म्हटलं जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी LIC ची 'बिमा-सखी योजना' (Bima Sakhi Yojana) लाँच करणार आहेत 18-70 या वयोगटातील महिलांना सक्षम करण्यासाठी, ज्या महिलांनी 10 वी उत्तीर्ण आहेत त्यांना आर्थिक साक्षरता आणि विमा जागरुकता वाढवण्यासाठी पहिल्या तीन वर्षांसाठी विशेष प्रशिक्षण आणि स्टायपेंड मिळेल. त्यानंतर महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकतात.
advertisement
या योजनेअंतर्गत 10वी उत्तीर्ण महिलांना एलआयसी एजंट बनण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाईल. ट्रेंड विमा सखी-महिलांना पहिल्या 3 वर्षांसाठी LIC कडून पगार किंवा स्टायपेंड दिला जाईल. पदवीनंतर तुम्हाला एलआयसीमध्ये विकास अधिकारी बनण्याची संधी मिळेल.
आर्थिक साक्षरता आणि विमा याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी काम करेल. एलआयसीने महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने विमा सखी योजना सुरू केली आहे. याचा फायदा लाखो महिलांना होणार आहे. आजही ग्रामीण भागात परिस्थिती नसल्याने किंवा शिक्षण महाग असल्याने 10-12 वीनंतर शिक्षण कठीण होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 09, 2024 10:51 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Bima Sakhi Yojana: पीएम मोदी आज लाडक्या बहिणींना देणार गिफ्ट, नेमकी काय आहे योजना?