LIC Scheme: एकदा करा गुंतवणूक, मिळेल आयुष्यभर 12000 रुपये पेन्शन

Last Updated:

या योजनेमुळे तुम्हाला रिटायरमेंटनंतर दरमहा 12000 रुपये पेन्शन मिळू शकते. सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला 12000 पेन्शनचा लाभ कसा मिळेल हे जाणून घेऊया.

एलआयसी स्किम
एलआयसी स्किम
मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) ने प्रत्येक श्रेणीतील लोकांसाठी योजना आणल्या आहेत. LIC द्वारे पेन्शन सारख्या योजना देखील ऑफर केल्या जातात. अशा परिस्थितीत, तुम्ही पेन्शन प्लॅन शोधत असाल तर एलआयसी प्लॅन तुमच्यासाठी चांगली असू शकते. यामध्ये कोणताही धोका नसून तुम्हाला दर महिन्याला नियमित उत्पन्नाअंतर्गत पेन्शनचा लाभ मिळत राहील. या योजनेविषयी सर्वकाही जाणून घ्या.
ही स्किम एलआयसी सरल पेन्शन योजना आहे. जी निवृत्तीनंतर दरमहा पेन्शनची हमी देते. त्याची खास गोष्ट म्हणजे, तुम्ही यामध्ये एकदाच गुंतवणूक करू शकता आणि तुम्हाला आयुष्यभर पेन्शन मिळत राहील. LIC सरल पेन्शन योजना ही सेवानिवृत्ती योजना म्हणून खूप प्रसिद्ध आहे. या योजनेमुळे तुम्हाला निवृत्तीनंतर दरमहा 12000 रुपये पेन्शन मिळू शकते. सेवानिवृत्तीनंतर तुम्हाला 12000 रुपये पेन्शनचा लाभ कसा मिळेल हे काही सोप्या मार्गांनी समजू शकते.
advertisement
एखादी व्यक्ती खाजगी क्षेत्रात किंवा सरकारी विभागात काम करत असेल आणि त्याच्या पीएफ फंडातून मिळालेली रक्कम आणि ग्रॅच्युइटीची रक्कम निवृत्तीपूर्वी गुंतवली तर त्याला आयुष्यभर दर महिन्याला पेन्शनचा लाभ मिळत राहील.
LIC सरल पेन्शन योजनेचे फीचर
एलआयसीच्या या योजनेबद्दल सांगायचे तर, 40 वर्षांपेक्षा कमी वयाची व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकत नाही. जास्तीत जास्त तुम्ही त्यात 80 वर्षापर्यंत कधीही गुंतवणूक करू शकता आणि या पॉलिसी अंतर्गत तुम्हाला मासिक 1000 रुपयांची वार्षिकी खरेदी करावी लागेल. तर त्रैमासिक अंतर्गत किमान 3000 रुपये, तसहामाहीच्या आधारे 6000 रुपये आणि वार्षिक आधारावर 12000 रुपयांची अॅन्युटी घेणे आवश्यक आहे.
advertisement
12000 रुपये पेन्शन कसे मिळेल?
एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेत तुम्ही वार्षिक किमान 12 हजार रुपयांची वार्षिकी खरेदी करू शकता. या योजनेंतर्गत जास्तीत जास्त गुंतवणुकीची लिमिट नाही. या योजनेत तुम्हाला हवी तेवढी गुंतवणूक करता येईल. या पॉलिसी योजनेअंतर्गत, कोणताही नागरिक एकदा प्रीमियम भरून वार्षिक, सहामाही, त्रैमासिक आणि मासिक पेन्शनचा लाभ घेऊ शकतो. एलआयसी कॅल्क्युलेटरनुसार, जर 42 वर्षांच्या कोणत्याही व्यक्तीने 30 लाख रुपयांची वार्षिकी खरेदी केली तर त्याला दरमहा 12,388 रुपये पेन्शन मिळेल.
advertisement
कर्जही घेऊ शकतो
एलआयसीचा हा प्लॅन खरेदी करण्यासाठी तुम्हाला www.licindia.in ला भेट द्यावी लागेल. जर या पॉलिसी अंतर्गत 6 महिने पूर्ण झाले असतील, तर तुम्ही गरज पडल्यास ते सरेंडर करू शकता. याशिवाय तुम्ही या योजनेअंतर्गत कर्जही घेऊ शकता. मात्र, कर्जाची रक्कम तुमच्या गुंतवणुकीवर अवलंबून असेल.
view comments
मराठी बातम्या/मनी/
LIC Scheme: एकदा करा गुंतवणूक, मिळेल आयुष्यभर 12000 रुपये पेन्शन
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement