LIC Policy Aadhaar Shila: रोज करा फक्त 29 रुपयांची गुंतवणूक आणि मॅच्युरिटीपर्यंत मिळतील लाखो रुपये!
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
LIC Policy : महिलांना या योजनेमुळे मिळणार आर्थिक बळ, रोज गुंतवा २९ रुपये आणि मॅच्युरिटीपर्यंत 4 लाख
मुंबई : LIC वेगवेगळ्या विमा योजना ग्राहकांसाठी आणते. काही योजना या मर्यादीत काळापर्यंतच असतात. तर काही योजना या लाँग टर्मसाठी चालवल्या जातात. एलआयसीने महिलांची आर्थिक गरज ओळखून त्यांच्यासाठी खास एक योजना सुरू केली आहे. या योजनेचं नाव आधार शिला योजना असं आहे. यामध्ये महिलांनी अगदी कमी गुंतवणूक करून एक मोठी निधी मिळवू शकतात.
महिलांच्या गरजा लक्षात घेऊन ही योजना करण्यात आली आहे. महिला हळू हळू घरात थोडे पैसे वाचवून आणि LIC च्या प्लॅनमध्ये गुंतवणूक करून मोठा पैसा जमा करू शकतात. 8 ते 55 वयोगटातील महिला एलआयसीच्या या योजनेत गुंतवणूक करू शकतात. या योजनेत तुम्ही दररोज २९ रुपये जमा करायचे आहेत. तुम्हाला मॅच्युरिटीवर 4 लाख रुपये मिळू शकतात.
advertisement
प्लॅनवर मिळणार मोठा रिटर्न
तुम्ही 20 वर्षे दर महिन्याला 899 रुपये (दिवसाला 29 रुपये) जमा केले तर पहिल्या वर्षी तुम्ही फक्त 10,959 रुपये जमा कराल. जर तुम्ही 20 वर्षांसाठी जमा केले तर 20 वर्षांत एकूण 2 लाख 14 हजार रुपयांची गुंतवणूक होईल. ज्यामध्ये तुम्हाला पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर 3 लाख 97 हजार रुपये मिळतील. या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करून महिला आपलं भविष्य सुरक्षित करू शकतात आणि 20 वर्षांनंतर मोठी त्यांना मिळेल.
advertisement
पण ही अट पाळणं गरजेचं
LIC ची आधारशिला योजना सुरक्षा आणि बचत दोन्ही देते. ज्यांचे आधार कार्ड बनले आहे, अशा महिलाच याचा लाभ घेता येईल. एलआयसीची ही योजना पॉलिसीधारक आणि त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाला आर्थिक मदत करते. पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर, पॉलिसीधारकाला पैसे मिळतात.
advertisement
तुम्हाला किमान १० तर कमाल २० वर्षासाठी गुंतवणूक केली तर फायदा जास्त मिळतो. यामध्ये ३ लाख रुपयांपर्यंत तुम्ही पैसे गुंतवू शकता. ७० वर्षांपर्यंत तुम्ही ही स्कीम एक्स्टेंड करू शकता. प्रीमियमचे पैसे तुम्ही महिना, तिमाही किंवा सहा महिन्यांनी भरू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 01, 2023 12:37 PM IST
मराठी बातम्या/मनी/
LIC Policy Aadhaar Shila: रोज करा फक्त 29 रुपयांची गुंतवणूक आणि मॅच्युरिटीपर्यंत मिळतील लाखो रुपये!