Ladki bahin Yojana: E KYC साठी माहिती भरली पण OTP येतच नाही, तुमच्यासोबतही असं झालंय का, काय आहे कारण?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या E-KYC प्रक्रियेत OTP व आधार संबंधित तांत्रिक अडचणी असून महिला व बालविकास विभाग उपाययोजना करत आहे, आदिती तटकरे यांनी आश्वासन दिले.
मुंबई: राज्य सरकारने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये, लाभार्थ्यांचे E-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब महिला व बालविकास विभागाच्या निदर्शनास आली आहे. या समस्येची विभागाने गांभीर्याने दखल घेतली आहे. सध्या तज्ज्ञांच्या माध्यमातून या तांत्रिक अडचणीवर लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि ते प्रगतीपथावर आहे.
महिला व बालविकास विभागातर्फे सर्व लाभार्थींना आश्वस्त करण्यात आले आहे की, ही तांत्रिक अडचण लवकरच दूर केली जाईल आणि E-KYC करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होईल. ज्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीला गती मिळेल.
आदिती तटकरे यांनी दिली महत्त्वाची माहिती
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे E-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
advertisement
महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपायोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण दूर होऊन E-KYC प्रक्रिया अधिक सुलभ व सुकर होणार याबाबत मी सर्व लाडक्या बहिणींना आश्वस्त करते.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे E-KYC करताना OTP बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्याची बाब निदर्शनास आली आहे.
महिला व बालविकास विभागाच्या वतीने याची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, तज्ञांच्या माध्यमातून याबाबत उपायोजना करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ही तांत्रिक अडचण…
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) October 3, 2025
advertisement
लोकांनी सांगितल्या आपल्या अडचणी
करोडो रुपयांच्या योजना,पण वेबसाइट उघडत नाही! जनतेचा वेळ, संयम आणि डेटा वाया जातो.सरकारी पोर्टल्सना नेहमी “तांत्रिक अडचण”असते,पण ई-कॉमर्स साइट्सना नाही.याचं कारण आणि जबाबदारी कोणाची? खरंच जाणून घ्यावं वाटतं करोडो रुपये खर्च होऊनही सरकारी वेबसाइट्सला नेहमी OTP लॉगिनच्या समस्या का?
advertisement
फक्त ओटीपी नाही बर्याच अडचणी आहेत, आधार कार्ड क्रमांक यादीत नाही, किंवा साईटच चालत नाही.किंवा ज्यांचे वडिल किंवा नवरा नाही अशांनी काय करायचं जर मोबाईल क्रमांक बंद झाला असेल तर? कोण सांगणार.
वडिल कामाला नसतील पण पोरं २.५ लाखांपेक्षा जास्त कमवत असतील तर काय? तरी पण लाभ मिळणार? pic.twitter.com/AQUAL7sWwv
— blank (@surmayimachhi) October 3, 2025
advertisement
फक्त ओटीपी नाही बर्याच अडचणी आहेत, आधार कार्ड क्रमांक यादीत नाही, किंवा साईटच चालत नाही.किंवा ज्यांचे वडिल किंवा नवरा नाही अशांनी काय करायचं जर मोबाईल क्रमांक बंद झाला असेल तर? कोण सांगणार. वडिल कामाला नसतील पण पोरं २.५ लाखांपेक्षा जास्त कमवत असतील तर काय? तरी पण लाभ मिळणार?
advertisement
एका युजरने आदिती तटकरेंना विनंती केली आहे. पात्र लाभार्थी पतीचे निधन 2008 साली झाले असुन त्यांचे आधार कार्ड नाही,कारण आधार कार्ड सेवा 2009 साली सुरु झाली. प्रत्यक्षात आधार कार्ड 2010 साली वितरीत करण्यात आले.तरी या योजनेचे ई-केवायसी पतीचे आधार कार्ड विना करणे शक्य नाही.तरी आपण या समस्येवर त्वरित तोडगा काढावा.
advertisement
जी महिला विधवा आहे जिला वडील आणि पती अशा महिलांना इतर कोणताही लाभ किंवा योजनेचे पैसे नाही मिळत लाडकी बहीण योजेने चे पैसे मिळतात या महिलांनी कशी करायची ekyc याकडे लक्ष द्या सर्व गोष्टीचा विचार करून Ekyc पडताळणी करायला सांगा महाराष्ट्र मध्ये कोणती महीला कशी जगते याचा विचार करावा अशी विनंती युजर्सनी आदिती तटकरे यांना ट्विट करुन दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 08, 2025 11:27 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Ladki bahin Yojana: E KYC साठी माहिती भरली पण OTP येतच नाही, तुमच्यासोबतही असं झालंय का, काय आहे कारण?