रेल्वेचा नवा नियम, केला जबरदस्त बदल; कन्फर्म तिकीट रद्द न करता प्रवासाची तारीख बदलता येणार
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Reschedule Confirmed Tickets: भारतीय रेल्वे जानेवारीपासून प्रवाशांना त्यांच्या कन्फर्म तिकीटाची ऑनलाइन प्रवास तारीख बदलण्याची सुविधा फुकट देणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या सुविधेमुळे रद्दशुल्काने होणारी अर्थिक गैरसोय कमी होणार, पण सीट मिळण्याची हमी नसणार आणि किंमत जास्त असल्यास फरक भरावा लागेल.
नवी दिल्ली: प्रवासाच्या योजना अनेकदा शेवटच्या क्षणी बदलतात आणि त्यामुळे प्रवाशांकडे असे रेल्वे तिकीट राहते ज्याचा काही उपयोग होत नाही. अशा अनपेक्षित परिस्थितींमुळे प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेने एक नवी योजना तयार केली आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी NDTV शी बोलताना सांगितले की, जानेवारीपासून प्रवाशांना त्यांच्या कन्फर्म रेल्वे तिकिटाचा प्रवासाचा दिवस ऑनलाईन बदलता येईल आणि त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही.
advertisement
सध्या प्रवाशांना प्रवासाची तारीख बदलायची असल्यास आधी तिकीट रद्द करून नवे तिकीट घ्यावे लागते. या प्रक्रियेमध्ये प्रवास रद्द करण्याच्या वेळेनुसार भाड्यातून ठराविक रक्कम कपात केली जाते. त्यामुळे प्रवाशांना केवळ आर्थिक तोटा नव्हे तर मोठ्या प्रमाणात गैरसोयही होते.
advertisement
वैष्णव म्हणाले, ही प्रणाली प्रवाशांच्या हिताची नाही आणि अन्यायकारक आहे. प्रवाशांना अनुकूल अशा या नव्या बदलांसाठी आधीच निर्देश देण्यात आले आहेत.
मात्र मंत्र्यांनी हेही स्पष्ट केले की या नव्या नियमांनुसार प्रवासाची तारीख बदलल्यानंतर नव्या दिवशी सीट हमखास मिळेल, अशी हमी नाही. हे पूर्णपणे सीटच्या उपलब्धतेवर अवलंबून असेल. जर नव्या प्रवास तारखेचे भाडे जास्त असेल, तर प्रवाशांना फरकाची रक्कम भरावी लागेल, असे NDTV च्या वृत्तानुसार सांगितले आहे.
advertisement
या निर्णयामुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. कारण सध्या रेल्वे प्रवास पुढे ढकलण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रद्द शुल्क भरावे लागते.
सध्याचे नियम असे आहेत:
-प्रवास सुटण्याच्या 48 ते 12 तासांदरम्यान कन्फर्म तिकीट रद्द केल्यास एकूण भाड्याच्या 25 टक्के रक्कम कपात केली जाते.
advertisement
-जर तिकीट 12 ते 4 तासांच्या आत रद्द केले, तर ही कपात अजून वाढते.
-आणि एकदा आरक्षण चार्ट तयार झाल्यानंतर, बहुतांश प्रकरणांत प्रवाशांना कोणतीही परतफेड मिळत नाही.
-या नव्या धोरणामुळे भारतीय रेल्वेच्या कोट्यवधी प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2025 10:39 PM IST
मराठी बातम्या/मनी/
रेल्वेचा नवा नियम, केला जबरदस्त बदल; कन्फर्म तिकीट रद्द न करता प्रवासाची तारीख बदलता येणार