advertisement

लहानग्या बाळानं हात लिफ्टच्या दरवाजावर ठेवला अन् क्षणभरात भयंकर घडलं; पिंपरीतील थरकाप उडवणारी घटना CCTV मध्ये कैद

Last Updated:

एका गृहनिर्माण सोसायटीत लिफ्टच्या दरवाजाच्या सापटीत चिमुकलीचा हात अडकल्याची भयावह घटना घडली. सुदैवाने, वेळीच मिळालेल्या मदतीमुळे एक मोठा अनर्थ टळला.

लिफ्टमध्ये अडकला बाळाचा हात
लिफ्टमध्ये अडकला बाळाचा हात
पुणे : लिफ्टचा वापर करताना लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत केलेली थोडीही निष्काळजी किती जीवघेणी ठरू शकते, याचाच प्रत्यय देणारी एक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. हा थरारक अनुभव पिंपरी-चिंचवडमधील दिघी परिसरात समोर आला आहे. एका गृहनिर्माण सोसायटीत लिफ्टच्या दरवाजाच्या सापटीत चिमुकलीचा हात अडकल्याची भयावह घटना घडली. सुदैवाने, वेळीच मिळालेल्या मदतीमुळे एक मोठा अनर्थ टळला.
काय घडलं?
दिघीतील एका सोसायटीमध्ये ही घटना घडली. एक महिला आपल्या चिमुकलीसोबत लिफ्टमधून जात होती. लिफ्ट एका मजल्यावर थांबल्यानंतर दरवाजा उघडला, मात्र तो पुन्हा बंद होऊ लागला. याच गडबडीत चिमुकलीने आपला लहानसा हात सहजपणे लिफ्टच्या दरवाजावर ठेवला होता. दरवाजा बंद होत असताना तिचा हात अचानक दरवाजाच्या मधल्या सापटीत अडकला. व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा >
advertisement
हे दृश्य पाहताच लिफ्टमधील महिला आणि आजूबाजूचे नागरिक प्रचंड घाबरले. वेदनेने रडणाऱ्या चिमुकलीला वाचवण्यासाठी नागरिकांनी तातडीने प्रयत्न सुरू केले. सुदैवानं काही मिनिटांच्या धडपडीनंतर तिची सुटका करण्यात यश आलं. या संपूर्ण घटनेचा थरार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
लिफ्टमध्ये जाताना लहान मुलांना एकटं सोडू नका किंवा त्यांना दरवाजाच्या जवळ उभे राहू देऊ नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. लिफ्टचे सेन्सर्स कधीकधी लहान मुलांच्या हातासारख्या बारीक गोष्टी ओळखण्यास असमर्थ ठरतात, त्यामुळे पालकांनी मुलांचा हात घट्ट धरून ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. या घटनेने पुन्हा एकदा लिफ्ट वापराच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
लहानग्या बाळानं हात लिफ्टच्या दरवाजावर ठेवला अन् क्षणभरात भयंकर घडलं; पिंपरीतील थरकाप उडवणारी घटना CCTV मध्ये कैद
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement