122,00,00,000 रुपयांचा स्कॅम, RBI ने केलं बॅन, या बँकेत खातं तर नाही, पैशांच काय होणार?

Last Updated:

तुमच्या पैशांचं काय होणार? काढता येणार की नाही किती काढता येणार याबाबत आरबीआयने स्वत: माहिती दिली आहे.

News18
News18
मुंबई : नियम मोडणाऱ्या बँकांविरोधात RBI कारवाई करत असते. आता तर एका बँकेनं चक्क 122 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा केल्याचं समोर आलं. त्यानंतर RBI ने या बँकेवर बंदी लावली होती. आता या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी बातमी महत्त्वाची आहे. तुमच्या पैशांचं काय होणार? काढता येणार की नाही किती काढता येणार याबाबत आरबीआयने स्वत: माहिती दिली आहे.
122 कोटींचा घोटाळा, पैसे काढण्यासाठी बँकेबाहेर रांगा
मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेत 122 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर, रिझर्व्ह बँकेने (RBI) 13 फेब्रुवारी रोजी या बँकेवर निर्बंध लादले. खातेदारांना एकही रुपया काढता येऊ नये असा आदेश देण्यात आला होता. यामुळे खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. अनेक जण बँकेच्या शाखांबाहेर रांगा लावून आपल्या पैशांची चौकशी करत होते.
advertisement
तीन जणांना अटक
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे ॲक्टिंग सीईओ देवर्षी घोष यांच्या तक्रारीवरून जनरल मॅनेजर हितेश मेहता यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली. हितेश मेहता यांच्यावर 122 कोटी रुपयांचा रिझर्व्ह फंड गहाळ केल्याचा आरोप आहे. त्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 316 (5) आणि 61 (2) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) आतापर्यंत या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे.
advertisement
RBI कडून कारवाई
घोटाळा समोर आल्यानंतर RBI ने तातडीने पावले उचलली. बँकेच्या संचालक मंडळाला एका वर्षासाठी हटवण्यात आले आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे माजी मुख्य महाव्यवस्थापक श्रीकांत यांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले.
RBI कडून मोठा दिलासा
अखेर खातेदारांसाठी दिलासादायक बातमी आली आहे. RBI ने निर्बंधांमध्ये काही शिथिलता देत खातेदारांना त्यांच्या खात्यातून 25, 000 रुपये काढण्याची परवानगी दिली आहे. ही रक्कम 27 फेब्रुवारीपासून काढता येणार आहे. यामुळे सुमारे 50 % खातेदारांना त्यांच्या संपूर्ण ठेवी काढण्याची संधी मिळणार आहे.
advertisement
बँकेच्या शाखा कुठे, कुठून काढता येणार पैसे?
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मुंबईत अंधेरी, बांद्रा, बोरीवली, चेंबूर, घाटकोपर, गिरगाव, गोरेगाव, नरीमन पॉईंट, कांदिवली, मालाड, मुलुंड, सांताक्रूझ आणि वर्सोवा या भागांत शाखा आहेत. याशिवाय नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि सूरत येथेही या बँकेच्या शाखा आहेत. तुम्ही तुमचे पैसे या पैकी कोणत्याही शाखेतून काढू शकता, मात्र त्या बाबत एकदा बँकेत चौकशी करा त्यामुळे तुमचं नुकसान होणार नाही.
advertisement
पैसे कसे काढता येतील?
RBI च्या परवानगीनुसार, खातेदार आता त्यांच्या शाखांमधून किंवा एटीएमद्वारे 25000 रुपये किंवा खात्यातील शिल्लक रक्कम काढू शकतात. यामुळे ग्राहकांना थोडा दिलासा मिळणार आहे. त्यापेक्षा जास्त रक्कम मात्र तूर्तास काढता येणार नाही असं RBI कडून सांगण्यात आलं आहे. बँकेच्या सर्व हालचालींवर नजर ठेवण्यात आली असून खातेदारांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील असं RBI ने म्हटलं आहे.
मराठी बातम्या/मनी/
122,00,00,000 रुपयांचा स्कॅम, RBI ने केलं बॅन, या बँकेत खातं तर नाही, पैशांच काय होणार?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement