Union Budget 2026: जे आजवर घडलं नाही, ते यावेळच्या बजेटमध्ये मोदी सरकार करून दाखवणार

Last Updated:

१ फेब्रुवारीला निर्मला सीतारामन सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत. बजेटमध्ये आयकर, कृषी कर्ज आणि पायाभूत खर्चावर भर असेल.

News18
News18
साधारणपणे रविवारी सरकारी सुट्टी असते, पण येणारा १ फेब्रुवारी भारताच्या आर्थिक इतिहासातील एक मोठा वर्किंग सनडे ठरणार आहे. गेल्या २५ वर्षांत जे घडलं नाही, ते यंदा मोदी सरकार करून दाखवणार आहे. स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात दुसऱ्यांदा आणि २००० सालानंतर पहिल्यांदाच देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी सादर केला जाणार आहे.
नेमका प्लॅन काय आहे?
१ फेब्रुवारी २०२६ रोजी रविवार आहे. नियमानुसार सुट्टी असल्यामुळे बजेट एक दिवस मागे किंवा पुढे ढकललं जाईल, असं वाटत होतं. मात्र, अर्थमंत्रालयाने जुन्या प्रथांना फाटा देत रविवारीच अर्थसंकल्प मांडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रविवारी सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत बजेटचं भाषण वाचतील. विशेष म्हणजे, या घोषणांचा परिणाम पाहण्यासाठी शेअर बाजारही रविवारी सुरू ठेवण्याची तयारी सुरू आहे.
advertisement
यशवंत सिंहांच्यानंतर आता निर्मला सीतारामन!
याआधी १९९९ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी रविवारी बजेट सादर केलं होतं. त्यानंतर आता सलग दुसऱ्यांदा मोदी सरकार हा प्रयोग करत आहे. या बजेटमुळे निर्मला सीतारामन यांच्या नावावर आणखी एक मोठा विक्रम जमा होणार आहे. सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार असून, त्यांनी मोरारजी देसाई आणि मनमोहन सिंग यांनाही मागे टाकलं आहे.
advertisement
या अर्थसंकल्पासोबतच अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक नवा विक्रम प्रस्थापित करणार आहेत. त्या सलग नऊ वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या देशाच्या पहिल्या अर्थमंत्री ठरतील. त्यांनी यापूर्वीच मोरारजी देसाई, पी. चिदंबरम आणि मनमोहन सिंग यांच्यासारख्या दिग्गजांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. १ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या या बजेटमध्ये मध्यमवर्गीयांसाठी आयकर स्लॅबमध्ये बदल, शेतकऱ्यांसाठी कृषी कर्जाचे नवे उद्दिष्ट आणि पायाभूत सुविधांवरील विक्रमी खर्च अशा मोठ्या घोषणांची शक्यता आहे.
advertisement
1 आणि 2 फेब्रुवारी दोन्ही दिवस महत्त्वाचे राहणार आहेत. 'विकसित भारत २०४७' या स्वप्नाला गती देण्यासाठी हे बजेट मैलाचा दगड ठरेल असं मानलं जात आहे. दुसरीकडे या दोन्ही दिवशी शेअर मार्केटमध्ये ट्रेण्ड काय सेट होतो ते पाहावं लागणार आहे. तर सोन्या चांदीचा फुगवटा फुटणार का तेही पाहावं लागणार आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Union Budget 2026: जे आजवर घडलं नाही, ते यावेळच्या बजेटमध्ये मोदी सरकार करून दाखवणार
Next Article
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement