Share Marketमध्ये स्टॉप-लॉस ऑर्डर बंद, सोमवारपासून नवे नियम; 15 मिनिटांत होणार ‘कॉल ऑक्शन’
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Share Market: 8 डिसेंबरपासून F&O सेगमेंटमध्ये मोठा बदल होणार असून NSE प्री-ओपन सेशन लागू करत आहे. स्टॉक आणि इंडेक्स फ्युचर्ससाठी कॉल ऑक्शन मॉडेलवर चालणारे हे 15 मिनिटांचे सेशन ओपनिंग प्राइस अधिक पारदर्शक आणि स्थिर बनवण्याची अपेक्षा आहे.
मुंबई: सोमवार 8 डिसेंबरपासून मार्केटमध्ये इक्विटी डेरिव्हेटिव्हज (F&O) सेगमेंटसाठी प्री-ओपन सेशन लागू होणार आहे. हा प्री-ओपन सेशन इंडिव्हिजुअल स्टॉक फ्युचर्स तसेच इंडेक्स फ्युचर्स या दोन्हीवर लागू राहील. NSE च्या माहितीनुसार हा सेशन सकाळी 9:00 ते 9:15 या 15 मिनिटांच्या कालावधीत कॉल ऑक्शन प्रोसेसद्वारे पार पडेल. हा 15 मिनिटांचा प्री-ओपन सेशन तीन टप्प्यांत विभागलेला आहे.
advertisement
1) ऑर्डर एंट्री पीरियड (9:00 AM –9:08 AM)
या दरम्यान ट्रेडर्सना त्यांचे ऑर्डर्स सबमिट, बदल किंवा कॅन्सल करण्याची पूर्ण परवानगी असेल. यामध्ये सिस्टम ७व्या आणि ८व्या मिनिटाच्या दरम्यान रँडम क्लोजर लागू करेल. महत्त्वाचे म्हणजे हा रँडम क्लोजर इक्विटी प्री-ओपन आणि इक्विटी डेरिव्हेटिव्हज प्री-ओपन या दोन्हीमध्ये स्वतंत्रपणे कार्यान्वित केला जाईल.
advertisement
2) ऑर्डर मॅचिंग आणि ट्रेड कन्फर्मेशन (9:08 AM –9:12 AM)
ऑर्डर एंट्री संपल्यानंतर लगेच ऑर्डर मॅचिंग विंडो सुरू होते. सिस्टम या टप्प्यात उपलब्ध ऑर्डर्सचा अभ्यास करून इक्विलिब्रियम प्राइस निश्चित करते आणि त्यावर आधारित मार्केटचा ओपनिंग प्राइस ठरतो. याच कालावधीत योग्य जुळणारे ऑर्डर्स एक्झिक्यूट केले जातात.
advertisement
3) बफर पीरियड (9:12 AM –9:15 AM)
हा टप्पा पूर्णपणे ट्रान्झिशन इंटरवल आहे. म्हणजेच प्री-ओपन फेज संपून नियमित कॉन्टिन्युअस ट्रेडिंग सेशन सुरू होण्यापूर्वीचा हा छोटा बफर मार्केटला स्थिरता देण्याचे काम करतो.
प्री-ओपन सेशनमधील महत्त्वाचे नियम:
प्री-ओपन सेशनदरम्यान ऑर्डर कलेक्शन आणि ऑर्डर मॅचिंग या दोन्ही टप्प्यांमध्ये NSE च्या नियमांचे पालन आवश्यक आहे.
advertisement
ऑर्डर कलेक्शन पीरियडमध्ये
लिमिट ऑर्डर आणि मार्केट ऑर्डरची परवानगी असेल.
मात्र स्टॉप-लॉस किंवा IOC (Immediate or Cancel) सारखे विशेष ऑर्डर स्वीकारले जाणार नाहीत.
ट्रेडर्सना या दरम्यान इंडिकेटिव्ह प्राइस, इक्विलिब्रियम प्राइस कॅलक्युलेशन तसेच डिमांड-सप्लाय डेटा रिअल टाइममध्ये पाहता येईल.
ऑर्डर मॅचिंग पीरियडमध्ये
advertisement
एक्सचेंज एकच इक्विलिब्रियम प्राइस निश्चित करतो आणि तोच पुढे ओपनिंग प्राइस बनतो.
ऑर्डर मॅचिंगची क्रमवारी पुढीलप्रमाणे असते:
लिमिट ऑर्डर ↔ लिमिट ऑर्डर
उरलेल्या लिमिट ऑर्डर ↔ मार्केट ऑर्डर
शेवटी मार्केट ऑर्डर ↔ मार्केट ऑर्डर
या टप्प्यात कोणताही ऑर्डर बदल किंवा कॅन्सल करता येत नाही.
advertisement
मार्जिन व्हेरिफिकेशनची सक्ती
NSE ने स्पष्ट केले आहे की प्री-ओपन सेशनमध्ये नोंदवले जाणारे सर्व ऑर्डर्स मार्जिनची तपासणी झाल्यानंतरच स्वीकारले जातील. कोणत्याही मेंबरकडे पुरेसा मार्जिन किंवा कॅपिटल नसेल तर त्याचा ऑर्डर सरळ रिजेक्ट केला जाईल.
या नव्या नियमांचा प्रभाव
प्री-ओपन सेशनच्या नव्या नियमनामुळे पारदर्शकता वाढण्याची तसेच योग्य आणि स्थिर ओपनिंग प्राइस मिळण्याची अपेक्षा आहे. इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्ससाठी प्री-ओपनची ही प्रक्रिया मार्केटची अस्थिरता कमी करण्यास आणि ओपनिंग ट्रेड्स अधिक सुव्यवस्थित करण्यास मदत करेल अशी NSE ची आशा आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2025 6:32 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Share Marketमध्ये स्टॉप-लॉस ऑर्डर बंद, सोमवारपासून नवे नियम; 15 मिनिटांत होणार ‘कॉल ऑक्शन’


