नोकरीत मन रमत नव्हतं, थेट राजीनामा दिला, आता भाकरी बनवून विकतोय, पाहा महिन्याची कमाई
- Published by:Mohan Najan
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
पनवेल मधील केतन भोईर याने अनेक धडे शिकून स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे. 25 वर्षीय केतन याने पनवेलमध्ये आई एकविरा भाकरी सेंटर सुरू केले असून या भाकरी सेंटरला खूप चांगला प्रतिसाद लाभत आहे.
निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई : व्यवसाय करायचा असेल तर पूर्ण तयारीने करावा, असे अनेक जण सांगत असतात. मात्र व्यवसाय करताना नेहमीच वेगवेगळ्या अडीअडचणींचा सामना सर्वांनाच करावा लागतो. अशातच पनवेल मधील केतन भोईर याने अनेक धडे शिकून स्वतःचा व्यवसाय उभा केला आहे. 25 वर्षीय केतन याने पनवेलमध्ये आई एकविरा भाकरी सेंटर सुरू केले असून या भाकरी सेंटरला खूप चांगला प्रतिसाद लाभत आहे.
advertisement
केतन यांच्या वडिलांचा बांधकामाचा व्यवसाय होता. मात्र आई-वडिलांच्या वाढत्या वयामुळे केतन यांनी स्वतःचे काहीतरी करायचं ठरवले. सुरुवातीला त्यांनी नोकरी केली. केतन यांनी एका खाजगी कंपनीमध्ये सुपरवायझरची नोकरी पाच वर्षे केली. मात्र काही केल्या नोकरीत त्याचे मन रमत नव्हते. काहीतरी स्वतःचा व्यवसाय करण्याचे केतन यांनी ठरवले.
advertisement
तेव्हा बहिणी सोबत चर्चा केल्यानंतर त्यांना असं जाणवले की आपल्या परिसरात अनेक कामगार वर्ग आहे आणि या विभागात चपाती किंवा भाकरी यांना विशेष मागणी आहे. त्यामुळे केतनने त्यांच्या बहिणी सोबत मिळून आई एकविरा भाकरी सेंटर सुरू करण्याचा ठरवले. मशीनने भाकरी बनवता येईल असं काहीतरी यंत्र केतन आणि त्यांच्या बहिणीने शोधून काढलं. आतापर्यंत हाताने बनवलेल्या भाकरीची चव तर आपण सर्वांनी चाखली असेल मात्र मशीनने बनवलेल्या भाकरीची चव देखील हाताने बनवलेल्या भाकरीपेक्षा कमी नाही.
advertisement
केतन यांच्याकडे चार वेगळ्या प्रकारच्या भाकरी विकत मिळतात. साधी भाकरी 15 रुपये, चपाती 10 रुपये, ज्वारीची आणि बाजरीची भाकरी देखील 15 रुपये अशा चार प्रकारच्या भाकरी त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. पनवेलच्या करंजाळे परिसरात आई एकविरा भाकरी सेंटर केतन यांनी 2022 साली सुरू केलं.
जेव्हा मी माझा व्यवसाय सुरू केला होता तेव्हा मला कोणताही प्रकारचे मार्गदर्शन लाभले नव्हते. मात्र आता मी या व्यवसायात पूर्णपणे अनुभवी झालो आहे. त्यामुळे मी भाकरीचा व्यवसाय तर करत आहे मात्र भाकरी बनवण्याच्या मशीन देखील आता लोकांना विकत आहे. तसेच भाकरीचा व्यवसाय पुढे कसा सुरू ठेवायचा याचे मार्गदर्शन देखील मी लोकांना देत आहे. या व्यवसायाच्या माध्यमातून मला महिन्याला 50 हजार रुपयांची कमाई होत आहे, असं केतन यांनी सांगितलं.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 26, 2025 4:59 PM IST
मराठी बातम्या/मनी/
नोकरीत मन रमत नव्हतं, थेट राजीनामा दिला, आता भाकरी बनवून विकतोय, पाहा महिन्याची कमाई