सरकारकडून एक्साइज ड्युटीत 3 रुपयांची कपात, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? समोर आली अपडेट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
गेल्या काही दिवसांपासून इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या सरकारी कंपन्यांवर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे मोठा ताण येत होता.
इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाचा फटका थेट सर्वसामान्य लोकांच्या किचनपर्यंत पोहोचला आहे. आधीच छोटे उद्योग LPG गॅस न मिळाल्याने बंद झाले आहेत. तर मोठ्या उद्योग धंद्यांना इलेक्ट्रिकवर शिफ्ट होण्याची वेळ आली आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने इंधनावरील एक्साइज ड्युटी कमी केली आहे.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या असतानाही, सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 3 रुपयांनी कमी केलं आहे. विशेष म्हणजे, डिझेलवरील १० रुपयांचं शुल्क चक्क शून्य करून सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थ मंत्रालयाने घेतलेला हा निर्णय तत्काळ लागू झाला असून, यामुळे इंधन दरवाढीला ब्रेक लागला आहे.
सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा
गेल्या काही दिवसांपासून इंडियन ऑईल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या सरकारी कंपन्यांवर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे मोठा ताण येत होता. पीटीआयच्या वृत्तानुसार, सरकारने एक्साइज ड्युटी कमी केल्यामुळे आता या कंपन्यांना होणारा तोटा भरून निघेल.
advertisement
याचाच अर्थ, आंतरराष्ट्रीय बाजारात तेल महागलं असलं, तरी भारतात सामान्य पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवण्याची गरज भासणार नाही. पेट्रोल डिझेलचे दर अव्वाच्या सव्वा वाढवले जाणार नाहीत. ते स्थिर राहातील त्यामुळे लोकांना त्याचा फायदा होईल.
प्रीमियम पेट्रोल खिसा रिकामा करावा लागणार
एकडे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला असला, तरी प्रीमियम आणि इंडस्ट्रियल इंधन मात्र महाग झालं आहे. दिल्लीत याचे दर ९९.८९ रुपयांवरून आता १०१.८९ रुपये झाले आहेत. उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेलचे दर ८७.६७ रुपयांवरून थेट १०९.५९ रुपयांवर गेले आहेत. खासगी क्षेत्रातील नायरा एनर्जीने आधीच पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल ३ रुपयांनी महाग करून ग्राहकांना झटका दिला आहे.
advertisement
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा
शुक्रवारी सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत थोडी घट पाहायला मिळाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले १० दिवसांसाठी पुढे ढकलले आहेत. त्यामुळे ब्रेंट क्रूडचा भाव थोडा उतरून १०७.११ डॉलरवर आला आहे. भारत आपल्या गरजेच्या ८८% तेल आयात करतो, त्यामुळे जागतिक स्तरावर मिळणारा हा प्रत्येक छोटा दिलासा भारतासाठी मोठा ठरतोय.
advertisement
VIDEO | Delhi: On excise duty on petrol slashed to Rs 3 from Rs 13 and diesel cut to zero from Rs 10, Union Finance Minister Nirmala Sitharaman says, "Honourable Prime Minister, despite it being Ram Navami, called a meeting of all concerned, and today we have announced a decision… pic.twitter.com/hYfsDWWdm9
— Press Trust of India (@PTI_News) March 27, 2026
advertisement
भारत आपल्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजांपैकी ८८ टक्के गरज आयातीद्वारे पूर्ण करतो. यातील बहुतांश आयात होर्मुझच्या सामुद्रधुनी या महत्त्वाच्या सागरी मार्गातून होते. युद्धामुळे इराणने या सागरी मार्गावर नियंत्रण मिळवले असून व्यापारी जहाजांची वाहतूक थांबवली आहे.
इराणने भारताला या मार्गातून काही अटींसह परवानगी दिली आहे. मात्र, ही सवलत पूर्णपणे मोफत असणार नाही. इराणने हे स्पष्ट केले आहे की, जहाजे जर त्यांच्या अटींचे पालन करतील तरच त्यांना मार्ग दिला जाईल. त्यामुळे तूर्तास तरी पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार का याबाबत कोणतेही संकेत मिळाले नाहीत मात्र होणारी दरवाढ थांबवली जाऊ शकतो आणि दर स्थिर राहातील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 27, 2026 12:56 PM IST
मराठी बातम्या/मनी/
सरकारकडून एक्साइज ड्युटीत 3 रुपयांची कपात, पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? समोर आली अपडेट







