132000 रुपयांवर पोहोचली चांदी, सोन्याचं काय? एका ग्रॅमसाठी किती मोजावे लागणार पैसे?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पितृपक्षात सोनं आणि चांदीच्या दरांनी नवा विक्रम केला आहे. MCX वर चांदी 1 लाख 32 हजार, सोने 1 लाख 13 हजारवर. गोल्डमन सॅक्सने पुढील वर्षी दरवाढीचा अंदाज वर्तवला.
पितृपक्षातही सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चांदीच्या दरांनी नवा विक्रम केला आहे. 1 लाख 32 हजार रुपयांवर नवे दर आहेत. सोन्याच्या दरांनीही नवा विक्रम नोंदवला आहे. पितृपक्षात दरवर्षी सोनं कमी होतं. मात्र यंदा हा ट्रेण्ड बदललं आहे. यंदा पितृपक्षात सोन्याचे दर 7 हजार रुपयांनी वाढले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारात आज चांदीने नवा विक्रम रचत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले.
मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीने प्रतिकिलो GST सह 1 लाख 32 हजार 294 रुपयांचा नवा उच्चांक गाठला. दिवसातील इंट्राडे उच्चांक 1 लाख 30 हजार 612 रुपयांवर पोहोचला. मागील बंद भावापेक्षा तब्बल 1.1 टक्क्यांची झेप घेत चांदी 1 लाख 30 हजार 333 रुपयांवर व्यवहारात होती. चांदीच्या या विक्रमी वाढीमागे मोठ्या प्रमाणात औद्योगिक मागणी कारणीभूत ठरली आहे. सोलर पॅनेल उत्पादन, इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटऱ्या आणि 5G नेटवर्कसारख्या नव्या तंत्रज्ञान क्षेत्रांत चांदीची मागणी झपाट्याने वाढली आहे. याशिवाय सोन्यातील तेजीचाही फायदा चांदीला होत आहे.
advertisement
सोनेही उच्चांकी पातळीच्या जवळ
सोनेही विक्रमी दरांच्या आसपासच स्थिर आहे. MCX वर सोने प्रतितोळा 1 लाख 13 हजाररुपयांवर व्यवहारात असून, 0.53 टक्क्यांनी वाढ नोंदवली आहे. दिवसातील उच्चांक 1 लाख 13 हजार 656 रुपये होता, तर ऑल टाइम हाय 1 लाख 13 हजार रुपये आहे.
advertisement
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावांवर अमेरिकन अर्थव्यवस्थेतील घडामोडींचा थेट परिणाम होताना दिसतोय. नुकत्याच आलेल्या रोजगाराच्या आकडेवारीनुसार नोकरभरती अपेक्षेपेक्षा कमी राहिली आहे. त्यामुळे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह पुढील आठवड्यात व्याजदरात कपात करू शकेल, अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे.
यावर्षी 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत 24 कॅरेट सोन्याचा दर 76 हजार 162 रुपयांवरून तब्बल 32 हजार 935 रुपयांनी म्हणजेच 43.24 टक्क्यांनी वाढून 1 लाख 9 हजार 97 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे चांदीचा दर 86 हजार 17 रुपयांवरून 38 हजार 482 रुपयांनी म्हणजेच तब्बल 44.73 टक्क्यांनी वाढून 1 लाख 24 हजार 499 रुपयांवर पोहोचला आहे.
advertisement
एका ग्रॅमसाठी 11 हजार 128 रुपये 24 कॅरेटसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. तर 22 कॅरेट एक ग्रॅमसाठी 10 हजार 200 रुपये मोजावे लागणार आहेत. आता एक ग्रॅम सोनं खरेदी करणं देखील परवडणार नाही. तर चांदीचे दर किलोमागे 1 लाख 32 हजारवर पोहोचले आहेत.
हिंदुस्तान समाचारने दिलेल्या वृत्तानुसार ‘गोल्डमन सॅक्स’च्या एका अहवालानुसार, पुढील वर्षीच्या मध्यापर्यंत सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात 4500-5000 प्रति औंसपर्यंत पोहोचू शकतात. भारतीय बाजारपेठेच्या संदर्भात बोलायचे झाल्यास, सोन्याचा भाव 1,45,000 ते 1,55,000 प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो, जो सध्याच्या दरापेक्षा सुमारे 30% जास्त असेल. हा अहवाल अशा वेळी आला आहे, जेव्हा जागतिक अनिश्चितता, भू-राजकीय तणाव आणि डॉलरचे कमकुवत होणे यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 12, 2025 12:01 PM IST
मराठी बातम्या/मनी/
132000 रुपयांवर पोहोचली चांदी, सोन्याचं काय? एका ग्रॅमसाठी किती मोजावे लागणार पैसे?