advertisement

Post Office Scheme: 5500 रुपये घरी बसून मिळतील, पोस्ट ऑफिसची खास योजना, सर्वसामान्यांना सुवर्णसंधी

Last Updated:

या योजनेत एकाच वेळी पैसे जमा करून दरमहा पेन्शनच्या स्वरूपात उत्पन्न मिळवू शकता. सुरक्षित गुंतवणूक आणि नियमित उत्पन्न शोधणाऱ्यांसाठी ही योजना अतिशय चांगली मानली जाते.

News18
News18
मुंबई: आपल्या देशामध्ये आजही सर्वांत जास्त लोकसंख्या ही आर्थिकदृष्ट्या मध्यमवर्गामध्ये मोडते. परिणामी, आपल्या कष्टाच्या पैशांची सर्वांत जास्त सुरक्षित गुंतवणूक कशी होईल, या कडे सर्वांत जास्त लक्ष दिलं जातं. म्हणूनच आजही अनेकांचापोस्ट ऑफिसच्या योजनांवर विश्वास असतो. पोस्ट ऑफिसदेखीलग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना सादर करत असतं.
रिस्क आहे पण फायदाही
या योजना मार्केट रिस्कपासून दूर आहेत आणि त्यातून चांगले रिटर्न्सही मिळतात. पोस्टाने पेन्शनची गरज असलेल्या नागरिकांसाठी एक योजना सुरू केलेली आहे. 'पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना' (पीओएमआयएस) असं या योजनेचं नाव आहे. या योजनेत एकाच वेळी पैसे जमा करून दरमहा पेन्शनच्या स्वरूपात उत्पन्न मिळवू शकता. सुरक्षित गुंतवणूक आणि नियमित उत्पन्न शोधणाऱ्यांसाठी ही योजना अतिशय चांगली मानली जाते.
advertisement
पीओएमआयएसमध्ये तुम्हाला पाच वर्षांसाठी एकदाच ठराविक रक्कम जमा करावी लागते. या कालावधीत तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर मासिक उत्पन्न म्हणून व्याज मिळते. ही योजना ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागांतील नागरिकांसाठी उपलब्ध आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये खातं उघडावं लागतं. जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये आवश्यक ती कागदपत्रं जमा केल्यास लगेच खातं सुरू होऊ शकतं. खातं सुरू करण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर आणि दोन पासपोर्ट साईजचे फोटो इत्यादी कागदपत्रं लागतात.
advertisement
किती मिळतं व्याज?
या योजनेवर सध्या 7.4 टक्के व्याजदर दिला जातो. विशेष म्हणजे यामध्ये टीडीएस कपात होत नाही. त्यामुळे आपलं संपूर्ण उत्पन्न आपल्याकडेच राहतं. भारतीय टपाल विभागाच्या इतर बचत योजनांप्रमाणे या योजनेलाही सरकारचा पाठिंबा आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना अतिरिक्त संरक्षण मिळतं.
advertisement
कशी करायची गुंतणूक?
एक हजार रुपयांपासून या योजनेतील गुंतवणूक सुरू केली जाऊ शकते. एका खात्यात जास्तीत जास्त नऊ लाख रुपये आणि संयुक्त खात्यात 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. एका खात्यात नऊ लाख रुपये गुंतवल्यास सध्याच्या 7.4 टक्के व्याजदरानुसार दरमहा 5,500 रुपये उत्पन्न मिळेल. ही रक्कम पुढील पाच वर्षांसाठी नियमितपणे मिळेल. जर तुमच्याकडे निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची कोणतीही सोय नसेल तर तुम्ही पोस्टाच्या या योजनेत एकरकमी गुंतवणूक करून स्वतःसाठी नियमित आर्थिक उत्पन्नाची व्यवस्था करू शकता.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Post Office Scheme: 5500 रुपये घरी बसून मिळतील, पोस्ट ऑफिसची खास योजना, सर्वसामान्यांना सुवर्णसंधी
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement