बँकेपेक्षा जास्त व्याज देते Post Office ची ही स्कीम, चान्स मिस केलात तर होईल पश्चाताप

Last Updated:

टाइम डिपॉझिटमध्ये कमीत कमी एक वर्ष आणि जास्तीत जास्त पाच वर्षांपर्यंत पैसा जमा करुन तुम्ही मालामाल होऊ शकता.

News18
News18
मुंबई : तुम्हाला तुमच्या बचतीवर जबदरस्त व्याज हवा असेल तर पोस्ट ऑफिसच्या स्किममध्ये गुंतवणूक करणं फायदेशीर ठरु शकते. पोस्ट ऑफिसची एक स्किम आहे जी तुम्हाला मालामा करेल. बिहारच्या पूर्णिया येथील प्रधान डाकघरचे पोस्ट मास्टर अवधेश कुमार मेहता यांनी टाइम डिपॉझिटविषयी माहिती दिलीये. टाइम डिपॉझिटमध्ये कमीत कमी एक वर्ष आणि जास्तीत जास्त पाच वर्षांपर्यंत पैसा जमा करुन तुम्ही मालामाल होऊ शकता.
यावर तुम्हाला जबरदस्त व्याज मिळेल. कुमार मेहता यांनी सांगितले की, ग्राहकांना आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो आणि नगदी पैसे किंवा चेकबुक घेऊन आपल्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खातं उघडावं लागेल. यानंतर तुमच्या खात्या जमा रक्कम टाइम डिपॉझिटअंतर्गत जमा करुन तगडे व्याज कमावले जाऊ शकते. पोस्टमास्तर म्हणाले की, जर कोणत्याही व्यक्तीला टाइम डिपॉझिट खात्यात पैसे जमा करायचे असतील तर तो किमान एक वर्ष आणि जास्तीत जास्त पाच वर्षांपर्यंत पैसे जमा करू शकतो.
advertisement
जर तुम्ही एका वर्षासाठी पैसे जमा केले तर तुम्हाला 6.6 टक्के व्याज मिळेल. दोन वर्षांच्या ठेवीवर 6.8 टक्के तर तीन वर्षांच्या ठेवीवर 6.9 टक्के व्याज दिले जाईल. याशिवाय तुम्ही पाच वर्षांसाठी रक्कम जमा केल्यास त्यावर 7 टक्के व्याज मिळेल. टाइम डिपॉझिटमध्ये पैसे जमा करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं.
advertisement
टाइम डिपॉझिटअंतर्गत सहा महिनेयपर्यंत लॉक इन पीरिडय राहतो. म्हणजे पुढचे सहा महिनेयपर्यंत पैसे तुम्ही काढू शकत नाही. एखाद्या व्यक्तीला पैसे काढायचे असतील तर त्यांना मॅच्योरिटी टाइमपूर्वी पैसे काढल्यास सेविंग खात्यावर मिळणारे व्याजदरच मिळेल. मात्र जर कुणी त्यांच्या ठरलेल्या मॅच्योरिटी टाइमवर पैसे काढले तर त्यांना टाइम डिपॉझिटअंतर्गत निर्धारित व्याजाचा लाभ मिळेल.
मराठी बातम्या/मनी/
बँकेपेक्षा जास्त व्याज देते Post Office ची ही स्कीम, चान्स मिस केलात तर होईल पश्चाताप
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement