पत्नीच्या नावे प्रॉपर्टी खरेदी करताय थांबा! हायकोर्टाचा हा निर्णय तुमच्यासाठी महत्त्वाचा

Last Updated:

इलाहाबाद उच्च न्यायालयाने निर्णय दिला की पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता तिच्या स्वतःच्या उत्पन्नातून विकत घेतली नसल्यास, ती कौटुंबिक मालमत्ता समजली जाईल.

News18
News18
मुंबई : कर वाचवण्यासाठी किंवा बायकोच्या नावाने गुंतवणूक केल्याने लागणारे व्याज, इतर खर्च या सगळ्या गो।ष्टी कमी होतात, आर्थिक सुरक्षितता हा देखील त्या मागे उद्देश असतो. त्यामुळे अनेकदा प्रॉपर्टी खरेदी करताना ती पत्नीच्या नावावर करतात. महिलांच्या नावावर प्रॉपर्टी घेतल्यास स्टँप ड्युटी कमी लागतो, काही राज्यांमध्ये तर 1-2 टक्क्यांची सवलत मिळते. पण जर ही पत्नी स्वतः कमावती नसेल, तर ही संपत्ती खरंच तिची वैयक्तिक समजली जाईल का? याच मुद्द्यावर इलाहाबाद उच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. या निर्णयाचा मोठा परिणाम घरोघरी होणाऱ्या संपत्तीच्या वादावर होऊ शकतो. हा निर्णय काय आहे ते प्रत्येक महिलेनं समजून घेणं गरजेचं आहे.
काय आहे हायकोर्टाचा निकाल?
एका संपत्तीच्या वादात कोर्टाने स्पष्टपणे म्हटलं आहे की, पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता ती स्वतःच्या उत्पन्नातून विकत घेतलेली नसल्यास, ती कौटुंबिक मालमत्ता समजली जाईल. हायकोर्टाच्या मते, भारतीय समाजरचनेनुसार अनेक स्त्रियांना स्वतःचा उत्पन्नाचा स्रोत नसतो, त्या पतीवर अवलंबून असतात. त्यामुळे पती स्वतःच्या उत्पन्नातून त्यांच्या नावावर प्रॉपर्टी खरेदी करतो.
कायद्यानुसार कोण आहे मालक?
हा निर्णय देत असताना कलम 114 चा आधार घेतला गेला आहे. न्यायालयाने म्हटलं की, पत्नीची स्वतःची कमाई असल्याचं स्पष्टपणे सिद्ध झाल्याशिवाय, तिच्या नावावरील प्रॉपर्टी पतीच्या उत्पन्नातून घेतली मानली जाईल. त्यामुळे ती प्रॉपर्टी कुटुंबातील इतर सदस्यांच्याही हक्काची ठरते. इतकंच नाही तर अशा केसमध्ये पत्नीला ती प्रॉपर्टी विकण्याचा किंवा तिचा लिलाव करण्याचा, तिसऱ्या व्यक्तीला देण्याचा अथवा नावावर करण्याचा कोणताच अधिकार उरत नाही. पतीच्या पश्च्यात यापैकी कोणत्याही गोष्टी पत्नीला करता येणार नाहीत.
advertisement
नेमकं काय घडलं होतं?
सौरभ गुप्ता नावाच्या एका व्यक्तीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याने याचिकेत म्हटलं होती की, त्याच्या दिवंगत वडिलांनी खरेदी केलेली मालमत्ता ही त्यांच्या पत्नीच्या (सौरभच्या आईच्या) नावावर केली होती, पण आईच ती आता कोणीतरी तिसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करत आहे. यावर कोर्टाने निर्णय देताना स्पष्ट केलं, जर आईकडे उत्पन्नाचा स्त्रोत नसेल आणि वडिलांनी ही प्रॉपर्टी त्यांच्या नावावर घेतली, तर ती त्याचा सहमालक होऊ शकते.
advertisement
पत्नीला कायदेशीर हक्क कधी मिळतो?
भारतीय कायद्यानुसार, पती जिवंत असेपर्यंत त्याच्या स्वतःच्या संपत्तीवर पत्नीचा थेट मालकी हक्क नसतो. 1956 च्या हिंदू उत्तराधिकार कायद्यानुसार, पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला संपत्तीत मुलासारखा हक्क मिळतो. पण जर पतीने मृत्यूपत्र केली नसेल, तरच पत्नीला त्याच्या स्वतःच्या संपत्तीत हिस्सा मिळू शकतो. अशा परिस्थितीमध्ये ती प्रॉपर्टी विकू शकत नाही किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या नावे परस्पर करू शकत नाही.
advertisement
जर तुम्ही प्रॉपर्टी तुमच्या पत्नीच्या नावावर घेत आहात, आणि ती कमावती नाही, तर भविष्यात त्या संपत्तीवर तुमची मुलं, इतर वारस देखील हक्क सांगू शकतात. त्यामुळे खरेदी करताना योग्य कागदपत्रं, उत्पत्तीचा स्रोत आणि मालकीचे दस्तऐवज नीट ठेवणे अत्यावश्यक आहे. पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी घेतल्याने स्टँप ड्युटीची सवलत मिळू शकते, पण ती पत्नीच्या एकटीच्या नावावर राहीलच याची काही शाश्वती नसते. विशेषतः जर ती स्वतः कमावती नसेल, तर ती संपत्ती कुटुंबाची मालमत्ता समजली जाऊ शकते.
मराठी बातम्या/मनी/
पत्नीच्या नावे प्रॉपर्टी खरेदी करताय थांबा! हायकोर्टाचा हा निर्णय तुमच्यासाठी महत्त्वाचा
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement