success story : नोकरी सोडून केला व्यवसाय, गडी 5 दिवसात झाला लखपती, कसं मिळवलं हे यश?

Last Updated:

business success story - श्रीनिवास गौडा यांची ही कहाणी आहे. ते कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मंगळुरू येथील रहिवासी आहेत. त्यांन गाढव पालनाचा व्यवसाय सुरू केला आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

श्रीनिवास गौडा यांची प्रेरणादायी कहाणी.
श्रीनिवास गौडा यांची प्रेरणादायी कहाणी.
दक्षिण कन्नड (कर्नाटक) - यशस्वी होण्यासाठी मेहनतीसोबत नशिबाचीही साथ लागते, असं म्हणतात. पण जर तुम्ही खरंच मेहनतीने काम केले तर नशिबही नक्कीच साथ देते आणि तुम्ही नक्कीच यशस्वी होतात. असेच एका व्यक्तीने सिद्ध करुन दाखवले आहे. या व्यक्तीने व्यवसाय सुरू करताच 5 दिवसातच ते लखपती बनले. जाणून घेऊयात ही प्रेरणादायी कहाणी.
श्रीनिवास गौडा यांची ही कहाणी आहे. ते कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मंगळुरू येथील रहिवासी आहेत. त्यांन गाढव पालनाचा व्यवसाय सुरू केला आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
श्रीनिवास गौडा यांनी जून 2022 मध्ये आपली चांगली नोकरी सोडून गाढव फार्म सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यात ते यशस्वी झाले आहेत. सुरुवातीला त्यांच्या या निर्णयाची अनेकांनी थट्टा केली. मात्र, त्यांनी हार मानली नाही. त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि फक्त 5 दिवसातच त्यांना तब्बल 17 लाख रुपयांची ऑर्डर मिळाली. गाढविणीच्या दुधामुळे त्यांचे नशिब चमकले.
advertisement
श्रीनिवास गौडा यांनी देशातील पहिले गाढवाचे फार्म सुरू केले. यामध्ये त्यांनी सुमारे 20 गाढवांसोबत आपलाय व्यवसाय सुरू केला. यामध्ये पहिल्या पाच दिवसांतच मोठा व्यवसाय केल्याने आज ते एक यशस्वी उद्योजक बनला आहे.
गाढविणीचे दूध जगात सर्वात महाग विकले जाते. अनेक देशांमध्ये या दुधाची किंमत 10 हजार रुपये प्रति लीटरपर्यंत आहे. भारतात त्याची मागणी कमी आहे. मात्र, तरीही हे दूध महाग दराने विकले जाते. त्यापासून बनवलेले पनीरही महागड्या दराने विकले जाते. हे दूध पौष्टिक घटकांनी समृद्ध आहे आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.
advertisement
आरोग्याच्या दृष्टानेही फायदेशीर -
गाढविणीचे दूध यामध्ये औषधीय गुण असतात, असे सांगितले जाते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. त्वचा रोग आणि अॅलर्जी दूर होते. मुलांमधील श्वसनाचे आजार दूर होतात.
मराठी बातम्या/मनी/
success story : नोकरी सोडून केला व्यवसाय, गडी 5 दिवसात झाला लखपती, कसं मिळवलं हे यश?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement