Home Loan कधी होणार स्वस्त? मोठ्या सरकारी बँकेने दिला संकेत

Last Updated:

SBI चेअरमन म्हणाले की, बँक बचत स्किमवर व्याजदर त्यांच्या शिखरावर आहेत, त्यामुळे पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये व्याजदरात पहिली कपात शक्य आहे.

होम लोन होणार स्वस्त
होम लोन होणार स्वस्त
मुंबई : होमलोनचा ईएमआय कधी कमी होणार, बँकेचे कर्ज कधी स्वस्त होणार? गेल्या दीड ते दोन वर्षांपासून जनता याची वाट पाहत आहे. आता ही वेळ जवळ येत आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयचे अध्यक्ष सीएस सेट्टी यांनी अपेक्षा केली आहे की फेब्रुवारी 2025 मध्ये आरबीआय नाममात्र 25 आधार अंकांनी व्याजदरात कपात करेल. ते म्हणाले, 'आम्हाला विश्वास आहे की, व्याजदरात पहिली कपात पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये शक्य आहे. अशा परिस्थितीत, ग्राहकांना सध्याच्या व्याजदरांनुसार बँक बचत योजनांवर रिटर्न मिळत राहील. परंतु बँकेकडून कर्ज घेणाऱ्यांना व्याजदर कपातीसाठी फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. 'एसबीआयचे अध्यक्ष म्हणाले की सेव्हिंग स्किमवरील व्याजदर त्यांच्या शिखरावर आहेत.'
अमेरिकेत व्याजदरात कपात
वास्तविक, अमेरिकेसह जगातील काही केंद्रीय बँकांनी व्याजदरात कपात करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. परंतु, आरबीआयने आजपर्यंत पॉलिसी रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही, त्यामुळे आगामी पतधोरणात रिझर्व्ह बँक याबाबत घोषणा करू शकते, असे मानले जातेय. तसंच, रिझर्व्ह बँकेने ठरवून दिलेल्या मर्यादेत चलनवाढ आटोक्यात येईपर्यंत धोरणात्मक दरात कोणताही बदल होणार नाही, असे आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांचे म्हणणे आहे.
advertisement
अलीकडेच सेंट्रल बँक ऑफ अमेरिकाने व्याजदरात 25 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. आता व्याजदर 4.50% ते 4.75% दरम्यान असतील. याआधी 18 सप्टेंबर रोजी फेडने व्याजदर 50 बेसिस पॉईंटने कमी केले होते. मार्च 2020 नंतर फेडरल रिझर्व्हने सप्टेंबर 2024 मध्ये व्याजदरात कपात केली होती. आता आरबीआयच्या आगामी बैठकीत व्याजदर कपातीकडे लक्ष लागले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Home Loan कधी होणार स्वस्त? मोठ्या सरकारी बँकेने दिला संकेत
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement