Reliance Industries AGM 2025: जिओचा पहिला IPO कधी येणार? मुकेश अंबानी यांनी दिली महत्त्वाची अपडेट

Last Updated:

RIL AGM 2025 Today:जिओ प्लॅटफॉर्मचे 50 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. कंपनीने ५जी, फिक्स्ड ब्रॉडबँड आणि एआय तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक केली आहे.

News18
News18
RIL 48th Annual General Meeting: रिलायन्स इंडस्ट्रिची महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. सर्वसामान्य लोकांचं जीवन आणखी सुरक्षित आणि सोपं करण्याचा जिओचा मानस असल्याचं मुकेश अंबानी यांनी सांगितलं. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कंपनीने एक मोठी घोषणा केली. मुकेश अंबानी म्हणाले की जिओने 50 कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडला आहे.
कंपनीच्या इंडिया फर्स्ट मॉडेल मधील ही सर्वात मोठी कामगिरी असल्याचे म्हटले गेले. आर्थिक वर्ष 2025 मध्ये रिलायन्सची कामगिरीही जबरदस्त होती. कंपनीचा एकत्रित EBITDA 1.83 लाख कोटी होती. त्याच वेळी, कंपनीचा एकत्रित नफा 81,309 कोटी होता आणि एकत्रित महसूल 10.71 लाख कोटी होता. जिओ फॅमिली आता 50 कोटी ग्राहकांच्या ताकदीसह जगातील सर्वात मोठ्या डिजिटल समुदायांपैकी एक आहे.
advertisement
या सगळ्या गोष्टी होत असताना जिओच्या IPO बाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. जिओचा आयपीओ 2026 मध्ये येणार आहे. पाच महत्त्वपूर्ण वचन यावेळी मुकेश अंबानी यांनी ग्राहकांना दिली आहेत. इतकंच नाही तर जिओचा आयपीओ पहिल्या 6 महिन्यात 2026 मध्ये येणार आहे अशी घोषणा त्यांनी केली.
जिओ प्लॅटफॉर्मचे 50 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. कंपनीने ५जी, फिक्स्ड ब्रॉडबँड आणि एआय तंत्रज्ञानात मोठी गुंतवणूक केली आहे. जिओच्या लिस्टिंगमुळे किरकोळ गुंतवणूकदारांसाठी एक नवीन मोठी संधी उपलब्ध होईल. बाजारातील तज्ज्ञांचा अंदाज आहे की आयपीओद्वारे कंपनीचे मूल्यांकन १२-१३लाख कोटी रुपयांपर्यंत असू शकते. जिओचा आयपीओ गेल्या दशकातील सर्वात मोठा ऑफर ठरू शकतो. ब्रोकरेज हाऊसेसनी आधीच म्हटले आहे की जिओ आणि रिलायन्स रिटेलच्या लिस्टिंगमुळे आरआयएलच्या शेअरहोल्डर्सना अतिरिक्त मूल्य मिळेल.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Reliance Industries AGM 2025: जिओचा पहिला IPO कधी येणार? मुकेश अंबानी यांनी दिली महत्त्वाची अपडेट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement