'या' देशातील लोकांना गरिबी काय हेच माहित नाही; इथे महिन्याला कमीत कमी मिळतो 4 लाख पगार

Last Updated:

पृथ्वीवर असा एक देश आहे जिथं गरीबी, बेघरपणा आणि बेरोजगारी हे शब्दच अस्तित्वात नाहीत. इथं प्रत्येक नागरिकाला घर, नोकरी आणि आरोग्याची हमी मिळते. खरं तर, इथले लोक “गरीबी” म्हणजे काय, हेच विसरले आहेत.

AI Generated Photo
AI Generated Photo
मुंबई : जगात अनेक देश प्रगतीसाठी झगडत आहेत. काही ठिकाणी लोकांना दोन वेळचं अन्न मिळणं कठीण असतं, तर काही देशांमध्ये बेघरांची संख्या वाढत चालली आहे. पण या सगळ्याच्या उलट, पृथ्वीवर असा एक देश आहे जिथं गरीबी, बेघरपणा आणि बेरोजगारी हे शब्दच अस्तित्वात नाहीत. इथं प्रत्येक नागरिकाला घर, नोकरी आणि आरोग्याची हमी मिळते. खरं तर, इथले लोक “गरीबी” म्हणजे काय, हेच विसरले आहेत.
आता तुम्हाला या देशाबद्दल नक्कीच जाणून घेण्याची इच्छा झाली असेल. हा देश आहे, स्वित्झर्लंड (Switzerland). सुंदर पर्वत, स्वच्छ रस्ते आणि आल्हाददायक हवामानासाठी ओळखला जाणारा हा देश आता आपल्या ‘गरीबीमुक्त मॉडेल’ मुळेही जगभर चर्चेत आहे.
स्वित्झर्लंडमध्ये गरीबी कशी झाली गायब?
स्वित्झर्लंडच्या रस्त्यांवर एक गोष्ट तुम्हाला लगेच जाणवेल, इथे कोणीही भिक मागताना किंवा रस्त्यावर झोपताना दिसणार नाही. सरकारने गरीबी रोखण्यासाठी अशी व्यवस्था केली आहे की, कोणीही आर्थिक दृष्ट्या मागे राहत नाही.
advertisement
जर एखाद्याचं घर गेलं किंवा तो बेघर झाला, तर सरकार स्वतः त्याला घर उपलब्ध करून देते. फेडरल हाउसिंग पॉलिसी अंतर्गत देशातील 60 टक्के लोकांना अनुदानित घरे (subsidized housing) दिली जातात.
आरोग्यसेवा इथे मोफत आहे आणि ज्यांच्याकडे रोजगार नाही, त्यांना सरकारकडून फ्री करिअर ट्रेनिंग दिलं जातं. त्यामुळे प्रत्येकाला आपलं जीवन पुन्हा घडवण्याची संधी मिळते.
advertisement
उच्च वेतन आणि कठोर शिस्त
स्वित्झर्लंडमध्ये जगातील सर्वोच्च वेतन दिलं जातं. इथं किमान पगार सुमारे 4,000 युरो (अंदाजे 4 लाख रुपये) आहे. आणि जर एखाद्याची नोकरी गेली, तरी त्याला त्याच्या शेवटच्या पगाराचं 80% बेरोजगारी भत्ता सरकारकडून दिलं जातं.
या देशात शिस्तीला खूप महत्त्व दिलं जातं. रस्त्यावर कचरा टाकल्यास 10,000 युरोपर्यंत दंड, आणि सिगारेट फेकल्यास 300 युरोचा दंड ठोठावला जातो. म्हणूनच इथले रस्ते नेहमी स्वच्छ आणि सुंदर दिसतात.
advertisement
advertisement
का आहे स्वित्झर्लंड जगातील सर्वाधिक सुखी देशांपैकी एक?
स्वित्झर्लंड जगातील हॅपिनेस इंडेक्समध्ये नेहमी टॉप 5 देशांमध्ये असतो. कारण इथं प्रत्येकाला आवश्यक सुविधा, आर्थिक स्थैर्य आणि सामाजिक सुरक्षा दिली जाते. हे सगळं साध्य होण्यासाठी देशाने 19व्या शतकापासूनच धोरणात्मक पद्धतीने काम सुरू केलं.
आज स्वित्झर्लंड हे जिवंत उदाहरण आहे की जर सरकार आणि नागरिक दोघेही जबाबदारीने वागले, तर गरीबीसारखी समस्या कायमची मिटवणं शक्य आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
'या' देशातील लोकांना गरिबी काय हेच माहित नाही; इथे महिन्याला कमीत कमी मिळतो 4 लाख पगार
Next Article
advertisement
BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement