आताच गुंतवा पैसे नंतर होईल छप्परफाड कमाई, दिग्गच ब्रोकरेज फर्मची भविष्यवाणी
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
2025 च्या अखेरीस कशी असेल शेअर मार्केटची स्थिती? दिग्गच ब्रोकरेज फर्मची भविष्यवाणी
मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही महिन्यांपासून होत असलेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं. मागच्या नऊ महिन्यात शेअर मार्केटमध्ये मोठी पडझड झाली. गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले. त्यामुळे गुंतवणूकदारही भीतीपोटी पैसे काढून घेत आहेत. शेअर बाजारात पुन्हा सुगीचे दिवस येणार की नाही अशी भीती सतावत असताना दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील नामांकित ब्रोकरेज फर्म सिटीने भारतीय शेअर बाजाराच्या भविष्यातील कामगिरीबाबत आशादायक अंदाज व्यक्त केला आहे.
निफ्टी 50 होईल 26,000 वर!
सिटी ब्रोकरेज फर्मच्या मते, 2025 च्या अखेरीस निफ्टी 50 निर्देशांक 26,000 पातळीवर पोहोचू शकतो. सध्या निफ्टीच्या स्तरापेक्षा ही आकडेवारी 15 टक्क्यांनी वाढू शकते असं म्हटलं आहे. हे लक्षात घेऊन सिटीने भारतीय शेअर बाजारावर आपली भुमिका ‘न्यूट्रल’ वरून ‘ओवरवेट’ केली आहे, याचा अर्थ त्यांनी भारताच्या बाजारात अधिक गुंतवणुकीची शिफारस केली आहे. गुंतवणुकीसाठी ही चांगली संधी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सिटीच्या अहवालानुसार भारतीय शेअर बाजाराच्या उज्ज्वल भविष्याकडे निर्देश करणारे काही महत्त्वाचे घटक कोणते आहेत समजून घेऊया.
advertisement
शेअर बाजारात तेजी येण्याची कारणे
रेपो दरात आणखी कपात
सिटीच्या अंदाजानुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पुढील काही महिन्यांत रेपो रेटमध्ये आणखी कपात करू शकते. यामुळे कर्ज घेणे स्वस्त होईल आणि त्यामुळे बाजारात तरलता वाढेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या महिन्याच्या सुरुवातीला रेपो दरात 25 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे आणि भविष्यात आणखी 50 बेसिस पॉइंट्सची कपात होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सरकार वाढीव दराला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधांवर सतत खर्च करत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
advertisement
देशीय अर्थव्यवस्थेची ताकद
ब्रोकरेज फर्मच्या मते, भारताची अर्थव्यवस्था देशांतर्गत घटकांद्वारे चालते, ज्यामुळे अमेरिकन टॅरिफ धोरणांवरील चिंतांसह जागतिक अनिश्चिततांना तोंड देणे शक्य होते. भारतात ग्राहक खर्च वाढत आहे, ज्यामुळे कंपन्यांच्या कमाईतही वृद्धी होईल अशी अपेक्षा आहे. सध्याच्या किंमती तुलनेत भारतीय बाजार आकर्षक पातळीवर आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर वाढ होत आहे. सरकारकडून पायाभूत सुविधांवर (Infrastructure) मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे, ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.
advertisement
जागतिक अस्थिरता असूनही भारतीय बाजार मजबूत
जरी जागतिक बाजारात अनिश्चितता आहे, तरी भारतीय अर्थव्यवस्था घरेलू घटकांवर आधारित असल्यामुळे ती अशा अस्थिरतेचा सामना करण्यास सक्षम आहे. उदाहरणार्थ, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार तणावामुळे जागतिक बाजारात घसरण दिसून आली असली, तरी भारतीय कंपन्यांचा या देशांसोबतचा व्यापार तुलनेने कमी असल्यामुळे भारतावर फारसा परिणाम झाला नाही.
advertisement
जागतिक व्यापारातील मर्यादित जोखीम
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन रेसिप्रोकल टॅरिफच्या घोषणेने जागतिक बाजारपेठांना हादरवून सोडले आहे, ज्यामुळे व्यापार तणाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र, सिटीने म्हटले आहे की, भारतीय कंपन्यांचा अमेरिका आणि चीनसोबतच्या व्यापारात मर्यादित धोका आहे, ज्यामुळे या धोरणात्मक बदलांमुळे होणारा धोका कमी होतो.
advertisement
गुंतवणूकदारांसाठी संधी – पण सावध राहा!
भारतीय शेअर बाजारात होणाऱ्या संभाव्य वाढीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांसाठी ही एक चांगली संधी असू शकते. मात्र, अशा प्रकारच्या गुंतवणुकीसाठी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवणं महत्त्वाचं आहे. जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि स्थानिक आर्थिक धोरणांवर सतत लक्ष ठेवणंही गरजेचं आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांनी सिटीच्या या अंदाजानुसार योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. बाजारातील चढ-उतारांचा विचार करून गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.
advertisement
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 25, 2025 12:50 PM IST