‘या’ दोन कंपन्यांचे शेअर तुमच्याकडे आहेत? दिवाळीपूर्वी घसघशीत डिव्हिडंड मिळणार, वाचा...

Last Updated:

तिमाहीच्या निकषांवर इन्फोसिस कंपनीच्या नफ्यात 2.2 टक्के वाढ नोंदवण्यात आली.

फोटो : प्रातिनिधिक
फोटो : प्रातिनिधिक
इन्फोसिस या प्रसिद्ध आयटी कंपनीने तिच्या शेअर होल्डर्ससाठी एक मोठी घोषणा केली आहे. इन्फोसिस आपल्या शेअर होल्डर्सना प्रतिशेअर 21 रुपये एवढा अंतरिम डिव्हिडंड देणार आहे. कंपनीने नुकतीच याबाबत माहिती दिली आहे. 29 ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट तर 8 नोव्हेंबर ही पेआउट डेट निश्चित करण्यात आली आहे. या पूर्वी 2024 या आर्थिक वर्षासाठी इन्फोसिसने 20 रुपये अंतिम डिव्हिडंड, आठ रुपये स्पेशल डिव्हिडंड आणि 18 रुपये अंतरिम डिव्हिडंड घोषित केला होता.
तिमाहीच्या निकषांवर कंपनीच्या नफ्यात 2.2 टक्के वाढ नोंदवण्यात आली. जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीला 6,368 कोटी रुपयांचा नफा झाला होता. हा नफा या तिमाहीच्या अखेरीस 6,506 कोटी रुपयांवर पोहोचला. त्यामुळे इन्फोसिसच्या उत्पन्नात 4.3 टक्के वाढ झाली. मागील तिमाहीत 39,315 कोटी रुपये असलेलं कंपनीचं उत्पन्न 40,986 कोटी रुपयांवर पोहोचलं. गुरुवारी कंपनीचा शेअर 2.84 टक्के वधारला आणि 1974.55 रुपयांवर बंद झाला.
advertisement
दुसऱ्या बाजूला LTIMindtree या आयटी कंपनीने गुरुवारी इक्विटी शेअर होल्डर्ससाठी 20 रुपये प्रतिशेअर एवढा अंतरिम डिव्हिडंड जाहीर केला. तो देण्यासाठी 25 ऑक्टोबर ही रेकॉर्ड डेट असल्याचं निश्चित केलं. 2024 या आर्थिक वर्षाच्या निकालासह कंपनीने ही घोषणा केली. 30 दिवसांच्या आत हा डिव्हिडंड देणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं. सप्टेंबर 2024 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीला 1251.6 कोटी रुपयांचा नफा झाला. CNBC TV18 च्या पोलमध्ये कंपनीला 1227 कोटी रुपयांच्या नफ्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीला सुमारे 1135.1 कोटी रुपयांचा नफा झाला होता. म्हणजे नफ्यात सुमारे 10 % वाढ झाली आहे. 2025 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला 9432.9 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे. आधीच्या तिमाहीत ते 9142.6 कोटी रुपये एवढं होतं. कंपनीच्या शेअरची किंमत गुरुवारी (17 ऑक्टोबर) बाजार बंद झाला तेव्हा 0.77 टक्क्यांनी वधारली आणि 6,408 रुपये एवढी नोंदवण्यात आली. मागील वर्षभरात त्याच्या किमतीत 22.91 टक्के वाढ पहायला मिळाली.
advertisement
मोठ्या कंपन्या त्यांच्या शेअरहोल्डर्सना त्यांच्या एजीएम म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी अंतरिम डिव्हिडंड देतात. इन्फोसिस आणि LTIMindtree कंपन्यांचे शेअरहोल्डर असलेल्यांना या निर्णयामुळे चांगलाच फायदा मिळणार आहे.
मराठी बातम्या/मनी/Share Market/
‘या’ दोन कंपन्यांचे शेअर तुमच्याकडे आहेत? दिवाळीपूर्वी घसघशीत डिव्हिडंड मिळणार, वाचा...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement