Share market crash: 1 तासात 16000 कोटी बुडाले, शेअर बाजारात असं काय घडलं, पुढे काय होणार?

Last Updated:

Share market crash: इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये प्रचंड विक्रीचा दबाव, 16,000 कोटी रुपयांचं मार्केट कॅप बुडालं. CEO सुमित चावला यांचा कार्यकाळ 1 वर्षासाठी वाढवला. CFO गोविंद जैन यांनी राजीनामा दिला.

News18
News18
मुंबई: भारतीय शेअर बाजारात मोठा भूकंप! इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये प्रचंड विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे. अवघ्या एका तासात 16,000 कोटी रुपयांचं मार्केट कॅप बुडालं आणि गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झालं. एकेकाळी 1,576 रुपयांच्या उच्चांकावर असलेला हा शेअर आता केवळ 720.35 वर ट्रेड करत आहे. मागील 1 वर्षात हा शेअर 55% घसरला आहे, त्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत.
इंडसइंड बँकच्या घसरणीमागची कारणे
डेरिव्हेटिव्ह पोर्टफोलियोतील मोठी तांत्रिक चूक असल्याचं समोर आलं. इतकंच नाही तर 10 मार्च 2025 रोजी, बँकेने आपल्या डेरिव्हेटिव्ह पोर्टफोलियोमध्ये गडबड असल्याचे उघड केले. यामुळे 1,500 कोटी रुपयांचं संभाव्य नुकसान होऊ शकते. फॉरेक्स हेजिंगमध्ये त्रुटी असल्याने मागील काही तिमाहींचे नफा आकडे फुगवले गेले होते. या प्रकरणाचा बँकेच्या नेटवर्थवर 2.35% नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.
advertisement
RBI ने CEO च्या कार्यकाळात कपात
7 मार्च 2025 रोजी RBI ने CEO सुमित चावला यांचा कार्यकाळ 3 वर्षांऐवजी केवळ 1 वर्षासाठी वाढवला.यामुळे बँकेच्या नेतृत्वावर आणि व्यवस्थापनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
वाढती NPA (Microfinance NPA संकट)
बँकेच्या मायक्रोफायनान्स (MFI) विभागात अनुत्पादित कर्जे (NPA) सातत्याने वाढत आहेत.Q4FY24: 4.69% → Q1FY25: 5.37% → Q2FY25: 6.90% → Q3FY25: 7.47% अशी वाढ होताना पाहायला मिळाली. NPA च्या वाढत्या प्रमाणामुळे बँकेच्या आर्थिक स्थैर्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
advertisement
CFO चा राजीनामा आणि नियामक अडचणी
19 जानेवारी 2025 रोजी बँकेचे CFO गोविंद जैन यांनी राजीनामा दिला, त्यामुळे व्यवस्थापनाबद्दल अनिश्चितता वाढली.5 मे 2024 रोजी RBI ने बँकेच्या प्रमोटर्सना हिस्सेदारी वाढवण्यास मनाई केली, त्यामुळे गुंतवणुकीबाबत संभ्रम कायम आहे.
ब्रोकरेज हाऊसेसने मोठ्या प्रमाणावर रेटिंग्स घटवले आहेत.
जर एखाद्याकडे स्टॉक असेल तर त्याने काय करावे. ब्रोकरेज हाऊसचे नवीनतम रेटिंग - मोठ्या प्रमाणात डाउनग्रेड!
advertisement
सिटी: खरेदी करा, पण लक्ष्य कमी करून 1160 रुपये केले
मॅक्वेरी: खरेदी करा, पण व्यवस्थापनावर विश्वास नसल्याचे व्यक्त केले.
एमके ग्लोबल: खरेदी वरून जोडा पर्यंत कमी, लटार्गेटक्ष्य 875 रुपये
नुवामा: होल्ड वरून घट, टार्गेट 750 रुपये
DAM कॅपिटल: BUY वरून NEUTRAL, टार्गेट 920 रुपये
मोतीलाल ओसवाल: खरेदीतून तटस्थ, टार्गेट 925 रुपये
advertisement
51 ब्रोकरेज हाऊसेस पैकी 26 ने BUY सल्ला दिला तर 17 ने HOLD करण्याचा सल्ला दिला आहे. 8 ने SELL करण्याची शिफारस केली आहे. गुंतवणूकदारांनी पुढील काळात विशेष सावधगिरी बाळगावी, कारण शेअर आणखी खाली जाण्याची शक्यता आहे.
पुढे काय होणार?
प्रमोटर्सच्या हिस्सेदारी वाढीसंबंधी निर्णय अद्याप प्रलंबित आहे. CEO बदलणार की नाही याबाबत अनिश्चितता आहे. कार्यकाळ फक्त 1 वर्षासाठी वाढवला गेला आहे, त्यामुळे व्यवस्थापनावर विश्वास कमी झाला आहे. मायक्रोफायनान्स विभागातील NPA वाढत असल्यामुळे बँकेच्या नफ्यावर दबाव कायम राहील. काही दिवस शेअर बाजारात या स्टॉकच्या संदर्भात मोठी अस्थिरता पाहायला मिळू शकते. लहान गुंतवणूकदारांनी धोका पत्करण्याआधी योग्य सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
advertisement
(डिस्क्लेमर: या बातमीचा उद्देश केवळ माहिती देणे आहे, कोणत्याही योजनेत गुंतवणूक करण्याची शिफारस करणे नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं अत्यंत जोखमीचं आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कागदपत्रं, नियम, अटी वाचूनच करा. इथं दिलेली माहिती ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 मराठी कोणत्याही नफातोट्यासाठी जबाबदार राहणार नाही. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Share market crash: 1 तासात 16000 कोटी बुडाले, शेअर बाजारात असं काय घडलं, पुढे काय होणार?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement