'ह्युंदाई'चा महाआयपीओ! गुतवणुकदारांना करणार मालामाल? तज्ज्ञांच्या मते...

Last Updated:

या आयपीओच्या माध्यमातून ह्युंदाई 25 हजार कोटी रुपयांचा भाग भांडवल उभारणार आहे. भांडवली बाजारात कंपनी सूचिबद्ध झाल्यानंतर तिचे बाजारमूल्य 19 अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे. यामुळे ही देशातील आजवरची सर्वात मोठी निधी उभारणी ठरू शकते.

+
ह्युंदाई

ह्युंदाई आयपीओ.

निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : देशातील सर्वात मोठा आयपीओ पुढच्या आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडनं त्यासाठीची तयारी पूर्ण केली आहे. तब्बल 25,000 कोटी रुपयांचा हा आयपीओ असणार आहे. त्याचं लॉन्चिंग येत्या मंगळवारी, 15 ऑक्टोबरला होणार आहे. तसंच गुरुवारी 17 ऑक्टोबरपर्यंत हा आयपीओ खुला असेल. या आयपीओमधील गुंतवणूक फायद्याची असेल की नाही, याबाबत माहिती दिलीये गुंतवणूकदार आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीचे सल्लागार रुचिर थत्ते यांनी. ते गेल्या अनेक वर्षांपासून गुंतवणूकदार आणि गुंतवणुकीविषयी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
advertisement
भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांमध्ये अनेक आयपीओ लिस्ट झाले. या आयपीओंनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. लिस्ट झालेल्या कंपन्यांच्या माध्यमातून आयपीओमुळे गुंतवणूकदारांना फायदेशीर परतावा मिळालाय. आता शेअर बाजारात ह्युंदाई कंपनीचा आयपीओ येणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून ह्युंदाई 25 हजार कोटी रुपयांचा भाग भांडवल उभारणार आहे. ही मूळची दक्षिण कोरियातील असलेली मोटार निर्मिती कंपनी ह्युंदाईची उपकंपनी आहे. भांडवली बाजारात कंपनी सूचिबद्ध झाल्यानंतर तिचे बाजारमूल्य 19 अब्ज डॉलरवर जाण्याचा अंदाज आहे. यामुळे ही देशातील आजवरची सर्वात मोठी निधी उभारणी ठरू शकते.
advertisement
काय असेल किंमत?
गुंतवणूकदारांसाठी हा आयपीओ सोमवार, 15 ऑक्टोबर रोजी खुला होणार आहे. त्यासाठी प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडच्या आयपीओची किंमत 1865 ते 1960 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. हा भारतातला सर्वात मोठा आयपीओ असेल. आयुर्विमा महामंडळाची (LIC) 21,000 कोटी रुपयांची समभाग विक्री हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ मानला जातो.
advertisement
एका लॉटमध्ये किती शेअर्स?
ह्युंदाई मोटर इंडियाच्या आयपीओ लॉट साइजमध्ये 7 इक्विटी शेअर्स मिळतील. या आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी (QIB) 50 टक्क्यांहून अधिक, बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (NII) 15 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ऑफरचे 35 टक्के शेअर्स राखीव ठेवण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांसाठी 778400 इक्विटी शेअर्स राखीव आहेत. कर्मचाऱ्यांना प्रति समभाग 186 रुपयांची सवलत दिली जात आहे. शेअर वाटपाची प्रक्रिया शुक्रवार, 18 ऑक्टोबर रोजी पूर्ण केली जाईल आणि आयपीओ मिळवण्यात अपयशी ठरलेल्या गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे सोमवार, 21 ऑक्टोबरपासून परत केले जातील. ह्युंदाई मोटर इंडियाचे शेअर्स मंगळवार, 22 ऑक्टोबर रोजी बीएसई आणि एनएसई या दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर सूचीबद्ध अर्थात लिस्टेड होण्याची शक्यता आहे.
advertisement
ग्रे मार्केटमध्ये काय भाव?
ह्युंदाई मोटर इंडियाचा आयपीओ आज 147 रुपये जवळपास प्रीमियमवर आहे. आयपीओचा अप्पर प्राइस बँड आणि ग्रे मार्केटमधील सध्याचा प्रीमियम लक्षात घेतला तर ह्युंदाई मोटर इंडियाच्या शेअरची लिस्टिंग किंमत प्रति शेअर 2107 रुपये असण्याची शक्यता आहे. ग्रे मार्केटमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्यानं घसरण होतेय. आज ग्रे मार्केटमध्ये हा शेअर 147 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे, तर 7 ऑक्टोबरला हा शेअर 270 रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध होता. 3 ऑक्टोबरला त्याचा जीएमपी 360 रुपये आणि 28 सप्टेंबरला जीएमपी 500 रुपये होता.
advertisement
आआयपीओचं वर्गीकरण:
रिटेल गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये 15 ऑक्टोबरला गुंतवणूक करता येईल. तर, अँकर इन्व्हेस्टर्सला 14 ऑक्टोबरपासून गुंतवणूक करता येईल. यामध्ये संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 50 टक्के शेअर्स राखीव असतील. संस्थात्मक गुंतवणूकदार नसणाऱ्यांसाठी 15 टक्के, तर रिटेल गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के कोटा राखीव आहे. ह्युंदाईच्या एका शेअरची दर्शनी किंमत 10 रुपये निश्चित करण्यात आली आहे. कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांना आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असल्यास 186 रुपयांची सूट प्रति शेअर मिळणार आहे. या कंपनीनं आयपीओसाठी जून महिन्यात सेबीकडे कागदपत्र जमा केली होती. त्यानंतर सेबीकडून त्यांना गेल्या महिन्यात मंजुरी देण्यात आली होती.
मराठी बातम्या/मनी/Share Market/
'ह्युंदाई'चा महाआयपीओ! गुतवणुकदारांना करणार मालामाल? तज्ज्ञांच्या मते...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement