Share Market: विधानसभेच्या निकालाआधी कसा असेल मार्केटचा मूड, पैसे काढावे की गुंतवावे?

Last Updated:

शेअर मार्केटमध्ये भूकंप आणणारी 4 कारणं, विधानसभेचा निकालाचा कसा होणार परिणाम काय असेल आज मार्केटचा मूड?

News18
News18
मुंबई : एक्झिट पोल आणि अदानी यांच्यामुळे शेअर मार्केटमध्ये भूकंप आला होता. शेअर मार्केट बंद होताना 422 अंकांवर ट्रेडिंग थांबलं.मागच्या एका महिन्यात सेन्सेक्स 3995 अंकानी कोसळलं आणि गुंतवणूकदारांच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे. अमेरिकेच्या निवडणुकीनंतर सोनं आणि शेअर बाजारात मोठा दबाव होता.
सतत शेअर मार्केट कोसळत होतं. त्यामुळे गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं होतं. विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. या निकालापूर्वी शेअर मार्केटचा मूड कसा असेल जाणून घेऊया.
'मनी कंट्रोल'ने दिलेल्या वृत्तानुसार अदानी ग्रूपमुळे 21 नोव्हेंबर रोजी शेअर मार्केटमध्ये अक्षरश: वादळ आलं. अदानी कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. दुसरं सर्वात मोठं कारण म्हणजे रशिया युक्रेन यांच्यातील दिवसेंदिवस वाढत जाणारा तणाव आहे.
advertisement
रशियाने परमाणू हल्ल्याची धमकी दिली आहे. सध्या शेअर मार्केटची स्थिती चिंताजनक आहे. आधीच टेन्शन असताना रशिया युक्रेन यांच्यातल्या संघर्षानं आणखी दबाव वाढला आहे. FIIS मुळे शेअर बाजारात तणाव आहे. त्यांनी शेअर मार्केटमधून पैसे काढणं कायम ठेवलं आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिना हा अतिशय वाईट जात आहे.
गुंतवणूकदारांचं टेन्शन वाढलं आहे. तर म्युच्युअल फंडकडे अनेकजण वळत आहेत. शेअर मार्केटमध्ये आणखी काही दिवस अस्थिरता कायम राहील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्केट कमजोर होत आहे. त्याचे परिणामही दिसून येतील.
advertisement
राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या देखील महाराष्ट्राचे निकाल आशियातील मार्केटवर मोठे परिणाम करणारे ठरतील. महाराष्ट्रातील राजकारणात उलफेर झाला तर शेअर मार्केटमध्ये आणखी अस्थिरता वाढेल असे संकेत सध्या मिळत आहेत. आज आठवड्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आज शेअर्स विकण्याची किंवा पैसे गुंतवण्याची गडबड करू नका. मार्केटचा मूड पाहून सोमावरी गुंतणूक करू शकता.
डिस्क्लेमर- शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं जोखमीचं आहे. इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. इथे दिलेलं मतं ही ब्रोकरेज फर्मची आहेत. न्यूज18 मराठी कोणत्याही फायद्या-तोट्याची जबाबदारी घेत नाही. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
view comments
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Share Market: विधानसभेच्या निकालाआधी कसा असेल मार्केटचा मूड, पैसे काढावे की गुंतवावे?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement