Share Market Crash: या शेअर्सवर मंदीचे सावट, कधीही होऊ शकते मोठी घसरण
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
याचा परिणाम अनलिस्टेड शेअर्सवरही दिसून आला आहे. मात्र, काही स्टॉक्स अजूनही स्थिर राहिले आहेत, तर काहींनी मंदीच्या काळातही चांगली वाढ दर्शवली आहे.
मुंबई: 2025 ची सुरुवात शेअर बाजारासाठी निराशाजनक ठरली आहे. सततची घसरण आणि विदेशी गुंतवणूकदारांची विक्री यामुळे बाजारावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. याचा परिणाम अनलिस्टेड शेअर्सवरही दिसून आला आहे. मात्र, काही स्टॉक्स अजूनही स्थिर राहिले आहेत, तर काहींनी मंदीच्या काळातही चांगली वाढ दर्शवली आहे.
कोणत्या शेअर्समध्ये झाली मोठी घसरण?
Metropolitan Stock Exchange of India – 2024 मध्ये 1100% वाढल्यानंतर 2025 मध्ये 40% घसरला.
Matrix Gas Renewables – 31% घसरण, तर 2024 मध्ये फक्त 6% पडझड होती.
Motilal Oswal Home Finance – 2024 मध्ये 50% वाढल्यानंतर 2025 मध्ये 26% पडझड.
Hero FinCorp – 2024 मध्ये 45% वाढ, तर 2025 मध्ये 25% घसरण.
advertisement
Apollo Green Energy – 2024 मध्ये 33% घसरला, तर 2025 मध्ये आणखी 13% घसरला.
Vikram Solar आणि Oyo – 10% घसरण, Oyo आधीच 2024 मध्ये 15% पडला होता.
कोणते शेअर्स कमी प्रमाणात घसरले?
Capgemini Tech आणि HDFC Securities – फक्त 7.5% घसरले, 2024 मध्ये अनुक्रमे 24% आणि 1% वाढ.
API Holdings – 7.2% घसरला, 2024 मध्ये 15% पडझड झाली होती.
advertisement
Cochin International Airport – 5.4% घसरण, पण 2024 मध्ये 92% वाढ दर्शवली होती.
NSE (National Stock Exchange) – फक्त 3% घसरला, 2024 मध्ये 143% वाढला होता.
कोणते शेअर्स मंदीला न जुमानता वधारले?
Nayara Energy – 2025 मध्ये 16% वाढ, 2024 मध्ये तब्बल 346% वाढ.
NCDEX (National Commodity & Derivatives Exchange) – 2025 मध्ये 5% वाढ, 2024 मध्ये 27% घसरण.
advertisement
पुढे काय होणार? गुंतवणूकदारांसाठी मोठा इशारा!
UnlistedArena.com चे सह-संस्थापक मनन दोशी यांच्या मते, ग्रीन एनर्जी आणि सोलर सेक्टरमधील आकर्षण आता कमी होत आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष आता स्टॉक एक्सचेंज आणि फायनान्शियल सेक्टरच्या शेअर्सकडे आहे. WealthMills Securities चे क्रांती बथीनी यांनी सांगितले की, विदेशी गुंतवणूकदारांची विक्री, वाढलेले वैल्यूएशन्स, जागतिक व्यापारयुद्ध आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील अस्थिरता यामुळे बाजार कोसळला आहे.
advertisement
अनलिस्टेड शेअर्समध्ये गुंतवणूक करावी का?
अनलिस्टेड शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा धोका, लिक्विडिटी आणि लाँग टर्म होल्डिंग क्षमता समजून घेणे गरजेचे आहे. अनलिस्टेड शेअर्स विकत घेण्यासाठी योग्य ब्रोकर्स निवडणे आवश्यक आहे. हे शेअर्स पटकन विकता येत नाहीत, त्यामुळे गुंतवणूक दीर्घकालीन दृष्टीने करावी.
अनलिस्टेड शेअर्स कुठून आणि कसे खरेदी करायचे?
SEBI रजिस्टर्ड ब्रोकर्स – Unlisted Arena, UnlistedZone, Planify, Stockify, TradeUnlisted
advertisement
ऑनलाइन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स – Share India, Analah Capital, Gretex Corporate Services
डायरेक्ट प्रमोटर्स आणि कर्मचाऱ्यांकडून – ESOPs (Employee Stock Option Plans) द्वारे
Pre-IPO Investment – काही कंपन्या लिस्टिंगपूर्वी आपले शेअर्स विकतात
कसे खरेदी करायचे? (Step-by-Step Guide)
योग्य स्टॉक निवडा – कंपनीच्या फंडामेंटल्स, नफा, ग्रोथ आणि भविष्यातील संधी पाहा. SEBI रजिस्टर्ड प्लॅटफॉर्मवरच व्यवहार करा. ब्रोकर्सकडून प्राइस लिस्ट घ्या आणि योग्य किंमतीत शेअर्स खरेदी करा. पेमेंट करा आणि शेअर्स डीमॅट खात्यात ट्रान्सफर करून घ्या. लाँग टर्म होल्ड करा किंवा लिस्टिंगनंतर विक्री करा. लिस्टिंगपूर्वी स्वस्त दरात शेअर्स खरेदी करता येतात. लिस्टिंगनंतर मोठ्या परताव्याची संधी असते. पोर्टफोलियो डायव्हर्सिफिकेशन, गुंतवणुकीचे जोखीम वेगवेगळ्या क्षेत्रांत विभागले जाते.
advertisement
लिक्विडिटी रिस्क – हे शेअर्स पटकन विकता येत नाहीत.
वॅल्यूएशन रिस्क – योग्य बाजारभाव शोधणे अवघड असते.
कंपनी लिस्ट झाली नाही तर नुकसान होऊ शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 10, 2025 2:20 PM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Share Market Crash: या शेअर्सवर मंदीचे सावट, कधीही होऊ शकते मोठी घसरण