Stock Market Holiday 2025: शनिवार रविवार सोडून 14 दिवस बंद राहणार शेअर मार्केट, इथे चेक करा पूर्ण हॉलिडे लिस्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Stock Market Holiday 2025:बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने 2025 साठी शेअर बाजाराच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली.
नव्या वर्षात बँकांसारखंच शेअर मार्केट देखील बंद राहणार आहे. शनिवार आणि रविवार वगळता शेअर मार्केट 14 दिवस बंद राहणार आहे. 2025 मधील भारतीय शेअर बाजाराच्या सुट्ट्यांची यादी समोर आली आहे. पुढील वर्षी साप्ताहिक सुटी व्यतिरिक्त 14 दिवस बाजार बंद राहणार आहे.
बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने 2025 साठी शेअर बाजाराच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली. स्टॉक मार्केट हॉलिडे कॅलेंडरनुसार, 2025 मध्ये बीएसई आणि एनएसई वरील ट्रेडिंग 14 दिवसांसाठी बंद राहतील. यादीनुसार पुढील वर्षी साप्ताहिक सुट्टी सोडून आणखी १४ दिवस बाजार बंद राहणार आहे.
2025 मधील पहिली सुट्टी 26 फेब्रुवारी 2025 रोजी महाशिवरात्रीनिमित्त येईल. यादीनुसार, दिवाळी विशेष एक तासाचे मुहूर्त ट्रेडिंग सत्र मंगळवार, 21 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. मुहूर्त ट्रेडिंग सत्राच्या वेळा नंतर जाहीर केल्या जातील. स्टॉक एक्स्चेंजच्या मते, पुढील वर्षी म्हणजे 2025 मध्ये बीएसई आणि एनएसईवर ज्या दिवशी सामान्य व्यापार बंद राहतील.
advertisement
1. 26 फेब्रुवारी 2025 (बुधवार) रोजी महाशिवरात्रीची सुट्टी
2. 14 मार्च 2025 (शुक्रवार) रोजी होळीची सुट्टी
3. ईद-उल-फित्र (रमजान ईद) 31 मार्च 2025 रोजी (सोमवार) सुट्टी
4. 10 एप्रिल 2025 (गुरुवार) रोजी श्री महावीर जयंतीची सुट्टी
5. 14 एप्रिल 2025 (सोमवार) रोजी डॉ. बाबा साहेब आंबेडकर जयंतीची सुट्टी
6. 18 एप्रिल 2025 (शुक्रवार) रोजी गुड फ्रायडेची सुट्टी
advertisement
7. 01 मे 2025 (गुरुवार) रोजी महाराष्ट्र दिनाची सुट्टी
8. 15 ऑगस्ट 2025 रोजी (शुक्रवार) स्वातंत्र्य दिनाची सुट्टी
9. 27 ऑगस्ट 2025 (बुधवार) रोजी गणेश चतुर्थीची सुट्टी
10. 02 ऑक्टोबर 2025 (गुरुवार) रोजी महात्मा गांधी जयंती/दसऱ्याची सुट्टी
11. 21 ऑक्टोबर 2025 (मंगळवार) दिवाळी लक्ष्मीपूजनाची सुट्टी.
12. 22 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळी-बलिप्रतिपदा सुट्टी (बुधवार)
advertisement
13. 05 नोव्हेंबर 2025 (बुधवार) रोजी श्री गुरु नानक देव यांच्या प्रकाश गुरु पर्व सुट्टी
14. 25 डिसेंबर 2025 (गुरुवार) रोजी ख्रिसमसची सुट्टी
येत्या वर्षभरात फेब्रुवारी, मे, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये प्रत्येकी एक बाजार सुट्टी, मार्च आणि ऑगस्टमध्ये प्रत्येकी दोन सुट्या आणि एप्रिल आणि ऑक्टोबर महिन्यात तीन सुट्या असतील. BSE आणि NSE नुसार, 2025 मध्ये चार शेअर बाजार सुट्ट्या शनिवार/रविवारी येतील. शनिवार आणि रविवारी शेअर मार्केटवरील ट्रेडिंग बंद असतं.
advertisement
26 जानेवारी 2025 (रविवार) रोजी प्रजासत्ताक दिनाची सुट्टी
06 एप्रिल 2025 (रविवार) रोजी श्री राम नवमीची सुट्टी
07 जून २०२५ (शनिवार) रोजी बकरीदची सुट्टी
06 जुलै 2025 (रविवार) रोजी मोहरमची सुट्टी
या शेअर बाजाराच्या सुट्ट्यांमध्ये, इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह आणि SLB विभाग सक्रिय होणार नाहीत. याचा अर्थ असा की या सुट्टीच्या दिवशी बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 या देशांतर्गत इक्विटी बेंचमार्कवर व्यापार बंद राहील. भारतीय शेअर बाजारातील चलन डेरिव्हेटिव्ह विभागातील व्यवहार बंद राहतील. कमोडिटी डेरिव्हेटिव्ह आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स (EGR) सेगमेंटमध्ये देखील ट्रेडिंग बंद राहील. म्हणजेच बाजाराच्या सुट्टीच्या दिवशी सकाळी 9:00 ते संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) आणि NCDEX (नॅशनल कमोडिटी एक्सचेंज) वर कोणतेही व्यवहार होणार नाहीत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 30, 2024 1:52 PM IST
मराठी बातम्या/मनी/Share Market/
Stock Market Holiday 2025: शनिवार रविवार सोडून 14 दिवस बंद राहणार शेअर मार्केट, इथे चेक करा पूर्ण हॉलिडे लिस्ट