Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

Last Updated:

Silver Price: रुवारी पुन्हा एकदा चांदीच्या किमती वाढतच आहेत आणि नवीन उच्चांक गाठत आहेत. MCX वर मार्च चांदीच्या वायदा बाजारात चांदीच्या दरात सुमारे २ टक्क्यांची वाढ झाली.

चांदी ऑल टाइम हायवर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी ऑल टाइम हायवर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
Silver Price: गुरुवारी पुन्हा एकदा चांदीच्या किमती वाढतच आहेत आणि नवीन उच्चांक गाठत आहेत. MCX वर मार्च चांदीच्या वायदा बाजारात चांदीच्या दरात सुमारे २ टक्क्यांची वाढ झाली. चांदीचा दर तो १,९१,८०० प्रति किलो या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. ही सलग दुसरी वाढ, फेडरल रिझर्व्हच्या संभाव्य व्याजदर कपात, जागतिक पुरवठ्यातील कमतरता आणि गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदीमुळे झाली. दरम्यान, सोन्याच्या किमती थोड्याशा वाढीसह स्थिर राहिल्या आणि जागतिक बाजारपेठेत सोने आणि चांदी दोन्हीही जोरदारपणे ट्रेंड करत आहेत.
या आठवड्यात चांदीच्या दराची चमक सातत्याने वाढत आहे. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार असे सलग तीन दिवस चांदीच्या दरात वाढ झाली. बुधवारी, एमसीएक्स मार्च चांदीच्या वायदा बाजारातील दरात ३,७३६ (१.९८ टक्के) वाढ झाली आणि तो १,९१,८०० प्रति किलो या नवीन आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचला.
यापूर्वी, मंगळवारीही चांदीच्या किमतीत वाढ झाली होती. जेव्हा किमती ६,९२३ (३.८० टक्के) वाढून १,८८,६६५ प्रति किलोवर पोहोचल्या.
advertisement
जागतिक पुरवठ्यातील कमतरता आणि फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा या दोन कारणांमुळे चांदीच्या दरात मागील दोन दिवसांत वाढ झाली. त्याच वेळी सोन्याच्या किमतीतही थोडी वाढ झाली. फेब्रुवारी महिन्यात सोन्याच्या वायदा किमती ₹१७३ (०.१३%) वाढून १,३०,२८० रुपये प्रति १० ग्रॅम झाल्या. याचा अर्थ सोनं-चांदी पॉझिटीव्ह ट्रेंडमध्ये आहेत. मात्र, चांदी दर चांगलाच वधारत आहे.
advertisement

चांदीच्या दरात वाढ का? एक्सपोर्ट म्हणतात...

एक्सपर्टने 'CNBC आवाज'वर सांगितले की, चांदीने १,९१,००० चा नवा विक्रम गाठला आहे. दरम्यान, जागतिक बाजारात चांदीचा दर वधारला आहे. कॉमेक्स सिल्व्हर मार्च २०२६ चा कॉन्ट्रॅक्ट १.३ डॉलरने (२.१४%) वाढून ६२.१४ डॉलर प्रति औंस या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. फक्त दोन सत्रांत चांदीने ६.४ टक्क्यांनी वाढ केली आहे.
advertisement
'मोतीलाल ओसवाल'च्या रिपोर्टनुसार, चांदीच्या साठ्यात होत असलेली सतत घट आणि जागतिक पुरवठ्यात घट झाल्यामुळे किमतींना मजबूत आधार मिळत आहे. शिवाय, अमेरिकेच्या 'क्रिटिकल मिनरल्स' यादीत चांदीचा समावेश झाल्यानंतर गुंतवणूकदारांकडून चांदीला मागणी वाढली आहे.

ईटीएफमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढला...

मानव मोदी यांनी सांगितले की, चांदी ईटीएफमध्ये जोरदार खरेदी झाली आहे. आयशेअर्स सिल्व्हर ट्रस्टने गेल्या आठवड्यात ३२४ टनांची आवक नोंदवली. जुलैनंतरची ही सर्वोच्च पातळी आहे. यामुळे चांदीवरील गुंतवणूकदारांचा विश्वास आणखी मजबूत झाला आहे.
advertisement

सोनं खरेदीवर चीनचा डाव...

जगभरातील मध्यवर्ती बँका सोने खरेदी करत आहेत. चीनने सलग १३ व्या महिन्यात सोन्याचा साठा वाढवला आहे, जो आता ७४.१२ दशलक्ष ट्रॉय औंसच्या जवळपास आहे. हे सोन्याच्या किमतींसाठी एक मजबूत आधार देत आहे.
कॉमेक्स सोने (Comex Gold) सध्या प्रति औंस ४,२३४ डॉलरच्या आसपास व्यवहार करत आहे आणि फेडरल रिझर्व्हच्या व्याज दर घोषणेआधी बाजार सावध पवित्र्यात आहे.
advertisement
(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी असून कोणताही गुंतवणूक विषयी सल्ला नाही. गुंतवणुकीबाबत आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)
view comments
मराठी बातम्या/मनी/
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
Next Article
advertisement
Silver Price News: चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवणुकीसाठी ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?
  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

  • चांदी 'ऑल टाइम हाय'वर, गुंतवण्याची ही योग्य वेळ? एक्सपर्टचा सल्ला काय?

View All
advertisement