Share Market: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताय, मग या 10 टर्म्स माहितीच हव्यात
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Share काही लोक आयपीओ घेतात तर काही लोक शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना या क्षेत्रातील सगळ्या टर्म्स माहीत नसतात.
मुंबई: शेअर मार्केटमध्ये खूप लोक गुंतवणूक करतात. शेअर मार्केटमधील गुंतवणुकीत जोखीम आहे, मात्र परतावाही त्यातूनच जास्त मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे लोक त्यांच्याजवळ असलेल्या बचतीतून काही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवतात.
काही लोक आयपीओ घेतात तर काही लोक शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना या क्षेत्रातील सगळ्या टर्म्स माहीत नसतात. जे या श्रेत्रात गुंतवणूक करून नफा कमवू इच्छितात त्यांना काही बेसिक गोष्टी माहीत असायला हव्यात.
भारतात दोन मुख्य स्टॉक एक्सचेंज आहेत. एक बीएसई म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. तिथला निर्देशांक सेन्सेक्स जो प्रमुख 30 कंपन्यांची कामगिरी ट्रॅक करतो, तर दुसरा एनएसई म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज तिथला निर्देशांक निफ्टी, ज्यात प्रमुख 50 कंपन्यांची कामगिरी ट्रॅक केली जाते. आज आम्ही तुम्हाला शेअर मार्केटमधील महत्त्वाच्या 10 टर्म्सबद्दल माहिती देत आहोत.
advertisement
इंट्रा-डे ट्रेडिंग
बाजारात एकाच दिवशी शेअर्स खरेदी करून ते विकण्याला इंट्रा-डे ट्रेडिंग म्हणतात. इथे शेअर्स खरेदीचा हेतू गुंतवणूक नाही तर नफा कमावणं असतो.
ब्लू-चिप शेअर
मोठं मार्केट कॅप असलेल्या शेअर्सना ब्लू चिप शेअर म्हणतात. यात प्रत्येक क्षेत्रातील आघाडीच्या तीन कंपन्या असतात. रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, आयटीसी आणि ओएनजीसी ही याची उदाहरणं आहेत.
आयपीओ
आयपीओ म्हणजे इन्हिशियल पब्लिक ऑफर आहे. या प्रक्रियेत खासगी कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर बाजारात आणते आणि मग त्यात शेअर मार्केटमध्ये सार्वजनिकरित्या गुंतवणूक करता येते. छोट्या कंपन्याही निधी उभारण्यासाठी आयपीओ आणतात.
advertisement
बुल अँड बिअर मार्केट
मार्केटमध्ये तेजी असते तेव्हा त्याला बुल मार्केट म्हणतात, बाजारात घसरण सुरू झाल्यावर त्याला बिअर मार्केट म्हणतात.
रॅली
कोणत्याही निर्देशांकात किंवा शेअरमध्ये सतत तेजी असणं या स्थितीला रॅली म्हणतात. रॅलीनंतर अनेकदा घसरण पाहायला मिळते.
करेक्शन
मार्केटमध्ये सतत घसरण सुरू झाल्यावर त्याला करेक्शन म्हणतात.
ओएचएलएस
हे ओपन, हाय, लो आणि क्लोजचे ॲब्रिव्हेशन आहे. याचा अर्थ बाजार किती अंकांवर उघडला, उच्चांक किती गाठला, नीचांकी स्तर कोणता आणि कोणत्या स्तरावर बाजार बंद झाला. ही टर्म इंट्रा-डेसाठी वापरली जाते.
advertisement
ऑर्बिट्रेज
एकच शेअर एकाच वेळी वेगवेगळ्या मार्केट्समध्ये विकणं किंवा खरेदी करणं असा याचा अर्थ होतो.
स्टॉप लॉस
याचा अर्थ घसरणीचा तो स्तर, जिथे ब्रोकरेज हाउस स्टॉक विकण्याचा सल्ला देते. गुंतवणूकदाराचे जास्त पैसे बुडू नयेत, यासाठी हे केले जाते.
मार्केट कॅपिटलायझेशन
कंपनीच्या एकूण आउटस्टँडिंग शेअर्सची जी व्हॅल्यू असते, त्याला मार्केट कॅपिटलायझेशन म्हणतात. कोणत्याही कंपनीचे मार्केट कॅप तिच्या आउटस्टँडिंग शेअर्स व एका शेअरच्या मार्केट प्राइजचा गुणाकार करून काढलं जातं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 31, 2024 11:33 AM IST