Share Market : बजेटआधी शेअर बाजारात घसरण, दिवसभरात काय घडणार?

Last Updated:

Share Market : अर्थसंकल्प सादर होण्याआधी बाजारात सुरुवात वाढीने झाली. मात्र काही वेळातच घसरण व्हायला लागली.

(शेअर मार्केट)
(शेअर मार्केट)
दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज 2024चा अर्थसंकल्प संसदेत मांडणार आहेत. अर्थसंकल्प सादर होण्याआधी बाजारात सुरुवात वाढीने झाली. मात्र काही वेळातच घसरण व्हायला लागली. सकाळी सव्वा दहा वाजता सेन्सेक्स 145 अंकांनी घसरला तर निफ्टीतही 58 अंकांची घसरण झाली. सव्वा दहा वाजता सेन्सेक्स 80355 अंकावर तर निफ्टी 24451 अंकांवर होता. बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही 0.3 टक्क्यांनी वधारले होते. मात्र तासाभरात अंकात मोठी घसरण दिसून आली.
अर्थसंकल्पाचा परिणाम शेअर बाजारावरही होण्याची शक्यता आहे. सोमवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स 80502 अंकावर होता. तर मंगळवारी सुरुवातीला उसळी घेत 80724 अंकापर्यंत पोहोचला. पण नंतर तो 80355 पर्यंत खाली आला. केंद्र सरकार अर्थसंकल्पात काय घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अर्थमंत्री सीतारमण यांच्या पोतडीतून शेतकरी, महिला, रोजगार यांच्यासाठी घोषणा होण्याची शक्यता आहे. उद्योग, सेवा, आयटी या क्षेत्रासाठी केंद्र सरकार कोणत्या तरतुदी करणार? कोणत्या क्षेत्रासाठी किती तरतूद असेल यानुसार शेअर बाजारात चढउतार होऊ शकतो.
advertisement
सोमवारी शेअर बाजारात काय झालं?
बाजारात लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये संमिश्र व्यवहार होताना दिसतायत. अर्थसंकल्प सादर होण्याआधी सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. त्यामुळे बाजार घसरणीसह बंद झाला. शुक्रवारीसुद्धा बाजारात घसरण झाली होती. सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरणीसह बंद झाला.
मराठी बातम्या/मनी/
Share Market : बजेटआधी शेअर बाजारात घसरण, दिवसभरात काय घडणार?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement