Union Budget : म्युचअल फंड आणि शेअर मार्केटवाल्यांसाठी वाईट बातमी, द्यावा लागणार जास्त कर
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
Union Budget 2024 : अर्थसंकल्पात नव्या कर प्रणालीसह कराबाबत घोषणा होताच शेअर बाजारात मोठा भूकंप झाला. यामुळे गुंतवणूकदारांना फटका बसला.
दिल्ली : अर्थसंकल्पात नव्या कर प्रणालीसह कराबाबत घोषणा होताच शेअर बाजारात मोठा भूकंप झाला. शेअर बाजारात सेन्सेक्स 700 पेक्षा जास्त अंकांनी कोसळला. यामुळे गुंतवणूकदारांना फटका बसला. कॅपिटल गेन टॅक्सअंतर्गत कर वाढवण्यात आले आहेत. लाँग टर्म कॅपिटल गेन 2.50 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात आला आहे. तर निवडक एसेट्सवर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स वाढवून 20 टक्के केला आहे. या निर्णयानंतर बाजारात मोठी घसरण दिसून आली.
शेअर बाजारात कॅपिटल गेन टॅक्स दोन पद्धतीने लागतो. जर एखादा शेअर 1 वर्षाच्या आत विकला गेला आणि मिळणाऱ्या नफ्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागेल. तो तुमच्या टॅक्स स्लॅबवर आधारीत असेल. तर शेअर एक वर्षानंतर विकला गेला तर लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होईल. यात १ लाख रुपयांचा नफा झाला तर करमुक्त असेल. यापेक्षा जास्त नफा असल्यास त्यावर कर द्यावा लागेल.
advertisement
कॅपिटल गेन टॅक्स
कॅपिटलमधून होणाऱ्या नफ्यावर जो कर लावला जातो त्याला कॅपिटल गेन टॅक्स म्हटलं जातं. हे दोन प्रकारचे असतात. यात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स असतो.
नव्या कर प्रणालीत स्लॅबमध्ये बदल
नव्या कर प्रणालीत सॅलरीड क्लासचे १७ हजार ५०० रुपये वाचतील. नव्या कर प्रणालीत कमीत कमी स्लॅब अडीच लाखांवरून ३ लाखांपर्यंत वाढवला. तर ३-७ लाख रुपयांच्या स्लॅबवर ५ टक्के कर, ७-१० लाख रुपयांच्या स्लॅबवर १० टक्के कर, १० ते १२० लाख रुपयांवर १५ टक्के कर, १२-१५ लाखा रुपयांच्या स्लॅबवर २० टक्के कर, नव्या कर व्यवस्थेत १५ लाखांपेक्षा अधिक स्लॅबवर ३० टक्के कर लागू असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 23, 2024 1:03 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Union Budget : म्युचअल फंड आणि शेअर मार्केटवाल्यांसाठी वाईट बातमी, द्यावा लागणार जास्त कर