advertisement

Union Budget : इन्कम टॅक्सबाबत 2 घोषणा, नव्या कर प्रणालीत मोठे बदल

Last Updated:

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. यात नव्या कर प्रणालीत दोन मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

News18
News18
दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केला. यात नव्या कर प्रणालीत दोन मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. स्टँडर्ड डिडक्शन मर्यादा ५० हजारांहून ७५ हजारांपर्यंत वाढवण्यात आलीय. तर ३ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त असणार आहे. फॅमिली पेन्शन - पेन्शनर्ससाठी ५५ वरुन २५ हजार करण्यात आलं आहे. पर्सनल इन्कम टॅक्सबाबत निर्मला सीतारमण यांनी मोठी घोषणा केलीय. त्यांनी भाषणात नव्या कर प्रणालीसाठी सॅलरीड क्लासला दिलासा दिला. स्टँडर्ड डिडक्शन ५० हजारांवरून ७५ हजार रुपयांपर्यंत वाढवलं आहे.
नव्या कर प्रणालीत स्लॅबमध्ये बदल
नव्या कर प्रणालीत सॅलरीड क्लासचे १७ हजार ५०० रुपये वाचतील. नव्या कर प्रणालीत कमीत कमी स्लॅब अडीच लाखांवरून ३ लाखांपर्यंत वाढवला. तर ३-७ लाख रुपयांच्या स्लॅबवर ५ टक्के कर, ७-१० लाख रुपयांच्या स्लॅबवर १० टक्के कर, १० ते १२० लाख रुपयांवर १५ टक्के कर, १२-१५ लाखा रुपयांच्या स्लॅबवर २० टक्के कर, नव्या कर व्यवस्थेत १५ लाखांपेक्षा अधिक स्लॅबवर ३० टक्के कर लागू असेल.
advertisement
नव्या कर प्रणालीत टॅक्स स्लॅब
०-३ - टॅक्स नाही
३-७ - ५ टक्के
७ ते १० - १०
१०-१२- १२
१५- १५ क्के
१५ च्या वर - ३० टक्के
स्टॉक मार्केटमधील उत्पन्नावर कर
स्टॉक मार्केटमधून इनकम होणाऱ्यांसाठी वेगळा टॅक्स भरावा लागणार त्यावरील कर वाढवण्यात आला आहे. कॅपिटल गेन टॅक्स २ टक्क्यावरून १२.५ टक्के करण्यात आला. एक वर्षापेक्षा जास्त एसेट लाँग टर्म कॅपिटल गेन्समध्ये असेल. तर एसटीसीजी २० टक्के असणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Union Budget : इन्कम टॅक्सबाबत 2 घोषणा, नव्या कर प्रणालीत मोठे बदल
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement