भारतातील मीडिया आणि मनोरंजन इंडस्ट्री 100 अब्जपर्यंत पोहोचेल, लाखो नोकऱ्यांची संधी: मुकेश अंबानी
- Published by:sachin Salve
Last Updated:
'भारताचा मनोरंजन आणि सांस्कृतिक उद्योग ही देशाची खरी ताकद आहे. भारतातील मीडिया आणि मनोरंजन उद्योग पुढील दशकात तिप्पट वाढून...'
मुंबई: वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲण्ड एन्टरटेन्मेंट समिट – २०२५ अर्थात ‘वेव्हज्’ परिषदेचं मुंबईत आयोजन करण्यात आलं. यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी, 'भारतातील मीडिया आणि मनोरंजन उद्योग पुढील दशकात तिप्पट वाढून १०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे लाखो नोकऱ्या निर्माण होतील' असा विश्वास व्यक्त केला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल ॲण्ड एन्टरटेन्मेंट समिट – २०२५ कार्यक्रमाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमात राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे, माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर, माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह देशविदेशातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी, मुकेश अंबानी यांनी आपली भूमिका मांडली.
advertisement
'भारताचा मनोरंजन आणि सांस्कृतिक उद्योग ही देशाची खरी ताकद आहे. भारतातील मीडिया आणि मनोरंजन उद्योग पुढील दशकात तिप्पट वाढून १०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे लाखो नोकऱ्या निर्माण होतील. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जागतिक ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटमध्ये पंतप्रधान मोदींची उपस्थिती आशा, एकता आणि अढळ दृढनिश्चयाचा एक मजबूत संदेश देते' असं यावेळी मुकेश अंबानी म्हणाले.
advertisement
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध
"पंतप्रधान मोदींची आजची उपस्थिती खरोखरच आपल्यासाठी एक आशादायक आहे. पंतप्रधानांच्या असाधारण जबाबदाऱ्या आपल्याला माहिती आहेत, विशेषतः पहलगाममधील अलीकडच्या दहशतवादी हल्ल्यानंतर. म्हणूनच, पंतप्रधानांचे या मंचावर येणे एक मजबूत संदेश देते. आशा, एकता आणि अढळ संकल्पाचा संदेश आहे. इथं जमलेले सर्वजण पीडितांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त करताय. पंतप्रधान मोदीजी, शांती, न्याय आणि मानवतेच्या शत्रूंविरुद्धच्या या लढाईत तुम्हाला १४५ कोटी भारतीयांचा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांचा पराभव निश्चित आहे. भारताचा विजय निश्चित आहे," असंही यावेळी मुकेश अंबानी म्हणाले.
advertisement
आरआयएलच्या अध्यक्षांनी यापूर्वी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला होता. दहशतवादाला 'मानवतेचा शत्रू' असे संबोधून अंबानी म्हणाले की, 'कोणीही त्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन करू नये. "दहशतवादाच्या धोक्याविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढाईत आम्ही पंतप्रधान, भारत सरकार आणि संपूर्ण देशासोबत आहोत. पहलगाम हल्ल्यानंतर, अनेकांनी मला सांगितलं की सरकार वेव्हज पुढे ढकलेल, परंतु मला माझ्या पंतप्रधानांवर विश्वास आहे जे कोणत्याही आव्हानाला तोंड देऊ शकतात." असंही ते म्हणाले.
Location :
First Published :
May 01, 2025 6:23 PM IST
मराठी बातम्या/मनी/
भारतातील मीडिया आणि मनोरंजन इंडस्ट्री 100 अब्जपर्यंत पोहोचेल, लाखो नोकऱ्यांची संधी: मुकेश अंबानी