Gold Price : आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम; इतक्या किंमतीने घसरला सोनं-चांदीचा भाव,ग्राहकांसाठी सुवर्णसंधी
- Published by:Devika Shinde
- Reported by:Pratikesh Patil
Last Updated:
सराफा व्यापाऱ्यांच्या मते, जसे सोन्याच्या किमती वाढतात तसेच त्या कमी होण्याचीही शक्यता असते.
प्रतिकेश पाटील - प्रतिनिधी, मुंबई : सोनं-चांदीच्या दरात या आठवड्यात चढ-उतार पाहायला मिळाले. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली असून, सराफा बाजारातही अशीच परिस्थिती आहे. लग्नसराईच्या दिवसांमध्ये सोन्याचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आठवड्याभरातील या घसरणीने ग्राहकांमध्ये खरेदीसाठी उत्साह निर्माण केला आहे.
सोन्याचा दर यापूर्वी 85 हजार रुपये प्रति तोळा होता, परंतु आता तो 75 हजारांवर आला आहे. यासोबतच चांदीच्या दरातही लक्षणीय घसरण झाली आहे. सराफा व्यापाऱ्यांच्या मते, जसे सोन्याच्या किमती वाढतात तसेच त्या कमी होण्याचीही शक्यता असते. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत सोन्याचा दर 72 हजार रुपयांपर्यंत घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या लग्नसराईत दरवर्षी सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत असते. मात्र, यंदा सोन्याच्या किमतीत घट झाल्यामुळे खरेदीत वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात होणाऱ्या चढ-उतारामागे लग्नसराईपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी, वर्ल्ड ट्रेड आणि सध्याचे युद्ध हे कारणीभूत असल्याचे व्यापारी सांगतात. दरवर्षी दिवाळीनंतर लग्नाचे मूर्त असल्याने सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ होते पण यावर्षी सोन्याच्या दरात घट झाल्याने सोन्याच्या खरेदीत वाढ सुद्धा झाली आहे असे सोने व्यापाऱ्याकडून सांगण्यात येत आहे.
advertisement
आनंदाची बातमी!, लग्नसराईची वेळ अन् सोनं झालं स्वस्त, कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांनी सांगितलं कारण
कुमार जैन यांच्या मते, सध्या सोन्याच्या दर कमी झाल्याने विक्रीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, येत्या काही आठवड्यांत सोन्याचे दर पुन्हा वाढतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2024 7:28 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Gold Price : आंतरराष्ट्रीय बाजाराचा परिणाम; इतक्या किंमतीने घसरला सोनं-चांदीचा भाव,ग्राहकांसाठी सुवर्णसंधी