वयाच्या 85 वर्षापर्यंत कव्हरेज असणाराही मिळतो इन्शुरन्स; पण योग्य कोणता? हा आहे परफेक्ट पर्याय
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
लाइफ, हेल्थ, ट्रॅव्हल इन्शुरन्स असो किंवा तुमच्या गाडीचा इन्शुरन्स असो, तो खरेदी करणे नेहमीच फायदेशीर असतं. इन्शुरन्स संबंधित प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगळ्या असतात.
नवी दिल्ली : अचानक उद्भवणाऱ्या संकटमय परिस्थितीपासून अप्रिय घटनामुळे निर्माण होणाऱ्या बिकट आर्थिक परिस्थितीपर्यंत कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी इन्शुरन्स खरेदी करणं महत्त्वाचं मानलं जातं. आर्थिक नियोजनातही तो खूप उपयुक्त ठरतो. लाइफ, हेल्थ, ट्रॅव्हल इन्शुरन्स असो किंवा तुमच्या गाडीचा इन्शुरन्स असो, तो खरेदी करणे नेहमीच फायदेशीर असतं. इन्शुरन्स संबंधित प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगळ्या असतात. परंतु इन्शुरन्स कंपनी सर्वांसाठी एकाच प्रकारचे प्लॅन विकता येतील का, यावर भर देत असते. खरंतर मोठ्या प्रमाणात इन्शुरन्स प्रॉडक्ट उपलब्ध आहेत, पण त्याची माहिती विस्तृत स्वरुपात देण्यात येत असल्यानं, कोणता इन्शुरन्स प्लॅन योग्य आहे? इन्शुरन्स कव्हर रक्कम किती असावी? हे ठरवणे अवघड जाते.
इन्शुरन्सचे विविध प्रकार असून कंपन्या देखील भरपूर आहेत. अशावेळी योग्य प्लॅन निवडणे खूप महत्त्वाचं ठरते. त्यामुळे इन्शुरन्स खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जसे की, तुम्हाला कोणत्या प्रकारचे कव्हरेज हवे आहे? तुमच्या गरजा पूर्ण होत आहेत का? तुम्हाला किती वयापर्यंत इन्शुरन्स घ्यायचा आहे? यावरून तुम्ही योग्य इन्शुरन्स कंपनी निवडणे महत्त्वाचे असते. कारण त्यावरच तुमचा क्लेम सेटलमेंट अवलंबून असतो. इन्शुरन्स पॉलिसीसह त्यावर देण्यात येणारे अतिरिक्त फायदे, कव्हर हे देखील इन्शुरन्स खरेदी करताना लक्षात घेणं महत्त्वाचं असते. चला तर, आज आपण त्याबद्दलच जाणून घेऊ.
advertisement
कव्हर रक्कम योग्य असावी
इन्शुरन्स खरेदी करताना तुम्ही घेत असलेला इन्शुरन्स तुमच्या गरजा पूर्ण करतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे. अनेकजण इन्शुरन्स पॉलिसी खूप कमी कव्हरेज किंवा खूप जास्त कव्हरेजसह येतात. पण तुम्ही जितकी जास्त कव्हरेज रक्कम घ्याल, तितका तुमचा प्रीमियम जास्त असतो. त्यामुळे तुमचा सध्याचा आणि भविष्यातील खर्च आणि बचत लक्षात घेऊन योग्य कव्हरेज रक्कम निवडणं खूप महत्वाचं आहे.
advertisement
किती वयापर्यंत इन्शुरन्स घ्यावा?
तुम्हाला कोणत्या वयापर्यंत इन्शुरन्स उतरवायचा आहे, हे देखील महत्त्वाचे आहे. इन्शुरन्स सामान्यतः वयाच्या 85 व्या वर्षापर्यंत उपलब्ध असतो. परंतु त्या वयापर्यंत इन्शुरन्सची आवश्यकता नाही. खरतर, जोपर्यंत तुमच्या कुटुंबातील सदस्य आर्थिकदृष्ट्या तुमच्यावर अवलंबून आहेत, तोपर्यंत तुम्ही इन्शुरन्स घेणं चांगलं आहे.
advertisement
कंपनी कोणती निवडावी?
इन्शुरन्स खरेदी करताना योग्य कंपनी निवडणे देखील खूप महत्वाचं आहे. तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड चांगला असणारी कंपनी निवडा. ज्या कंपनीनं पूर्वी इन्शुरन्स दावे वेगानं आणि अचूकपणे हाताळले आहेत, ती निवडण्यास प्राधान्य द्या. तुमचाही दावा योग्यरित्या आणि वेळेवर निकाली काढला जाईल, असा विश्वास तुम्हाला देऊ शकणारी कंपनी निवडा.
रायडर लाभ
इन्शुरन्स पॉलिसीसह प्रदान करण्यात येणारे अतिरिक्त कव्हर किंवा वैशिष्ट्ये म्हणजे रायडर लाभ होय. यामध्ये गंभीर आजार कव्हर, अपघाती मृत्यू कव्हर, अपंगत्व कव्हर इत्यादी फायद्यांचा समावेश असू शकतो. हे तुम्हाला तुमच्या विशिष्ट गरजांनुसार इन्शुरन्स संरक्षण देते. या रायडर लाभाकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण संरक्षण मिळू शकेल.
advertisement
अपस्टॉक्सच्या सह संस्थापिका कविता सुब्रमण्यन यांनी याबाबत सांगितलं की, ‘इन्शुरन्स खरेदी करण्याचा असा कोणताही निश्चित दृष्टिकोन नसतो, जो प्रत्येकानं पाळणे आवश्यक आहे. परंतु महत्त्वाच्या निकषांवर आधारित इन्शुरन्स प्लॅनचे विश्लेषण करणे, इन्शुरन्स खरेदीची प्रक्रिया अतिशय सोपी बनवू शकते. योग्य माहिती असल्यानं इन्शुरन्स खरेदी करणे खूप सोपे होते, व ज्याचा फायदाही होतो.’
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 25, 2024 11:51 AM IST
मराठी बातम्या/मनी/
वयाच्या 85 वर्षापर्यंत कव्हरेज असणाराही मिळतो इन्शुरन्स; पण योग्य कोणता? हा आहे परफेक्ट पर्याय