Sensex : निवडणूक का इतर कोणती भीती? शेअर बाजाराला कशाची चिंता, एक्सपर्ट्सनी सांगितलं

Last Updated:

भारतातलं शेअर मार्केट सध्या अस्थिर झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आणखी वाढली आहे. कारण निफ्टी आणि सेन्सेक्सने महत्त्वपूर्ण पातळी पार केली आहे.

निवडणूक का इतर कोणती भीती? शेअर बाजाराला कशाची चिंता, एक्सपर्ट्सनी सांगितलं
निवडणूक का इतर कोणती भीती? शेअर बाजाराला कशाची चिंता, एक्सपर्ट्सनी सांगितलं
मुंबई : भारतातलं शेअर मार्केट सध्या अस्थिर झाल्याचं दिसून येत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आणखी वाढली आहे. कारण निफ्टी आणि सेन्सेक्सने महत्त्वपूर्ण पातळी पार केली आहे. निफ्टी 50 इंडेक्स 22,200च्या महत्त्वाच्या पातळीहून खाली घसरला आहे. अशा स्थितीत ही घसरण आणखी वाढू शकते, असा अंदाज मार्केट एक्सपर्ट्सनी व्यक्त केला आहे. आज सकाळी बेंचमार्क निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 लाल चिन्हासह उघडले आणि तेव्हापासून त्यात सातत्याने घसरण होत आहे. देशात सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांचा बाजारावर दबाव पाहायला मिळत आहे. बाजारातल्या या सततच्या घसरणीत चांगल्या तिमाही निकालांमुळे ऑटो सेक्टरमध्ये चांगली तेजी पाहायला मिळत आहे. याशिवाय आयटी शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळत आहे. एफएमसीजी, एनर्जी, मेटल आणि इन्फ्रासह इतर क्षेत्रांमध्ये विक्रीचा दबाव वाढत आहे.
बाजारासाठी निवडणुकीचे निकाल असणार ट्रिगर
फिस्डॉमचे रिसर्च हेड नीरव करकेरा यांनी म्हटलं, की बाजारात झालेल्या घसरणीनंतर आज सावरण्याचा प्रयत्न केला. निर्देशांक आजही तेजीचा ट्रेंड कायम ठेवण्याचा प्रयत्न करू शकतील. परंतु वाढ मर्यादित राहण्याची शक्यता आहे. देशात सध्या सुरू असलेल्या सार्वत्रिक निवडणुकांचा बाजारावर परिणाम होत आहे कारण सध्याच्या भाजप-एनडीए सरकारच्या विजयाच्या फरकाकडे बाजाराचं लक्ष लागलं आहे. जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गौरांग शाह म्हणाले, "निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत बाजार अस्थिर राहून असेच चढ-उतार राहण्याची शक्यता आहे."
advertisement
निफ्टीसाठी महत्त्वाची लेव्हल
सध्या बाजारासाठी कोणतेही पॉझिटिव्ह क्लू नाहीत. त्यामुळे बाजार कमजोर राहण्याची दाट शक्यता आहे. असित सी मेहता, इन्व्हेस्टमेंट इंटरमीडिएट्सचे एव्हीपी टेक्निकल अँड डेरिव्हेटिव्ह रिसर्च हृषिकेश येडवे म्हणाले, "जोपर्यंत निफ्टी 22,400च्या खाली राहील तोपर्यंत कमी काळासाठी कमजोरी कायम राहील. जर बेंचमार्क 22,410 च्या वर गेला, तर आपल्याला 22,500-22,600 पर्यंत रिलीफ रॅली दिसू शकते," असंही त्यांनी नमूद केलं.
advertisement
मागच्या एका आठवड्यात शेअर मार्केटमध्ये बरीच घसरण पाहायला मिळत आहे. मार्केट अस्थिर झाल्याने गुंतवणुकदारही चिंतेत आहेत. सध्या सुरू असलेल्या निवडणुकांचा परिणाम शेअर मार्केटवर दिसून येत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Sensex : निवडणूक का इतर कोणती भीती? शेअर बाजाराला कशाची चिंता, एक्सपर्ट्सनी सांगितलं
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement