Panvel Accident : तो घरी कधी परतणार नाही, बाईक चालवतना एक चूक अन 29 वर्षाच्या तरूणाचा जागीच मृत्यू

Last Updated:

Panvel Accident News : उलवे येथे 29 वर्षीय तरुणाने बाईक चालवताना केलेल्या चुकीमुळे जागीच मृत्यू झाला. नेमके काय घडले ते जाणून घेण्यासाठी सविस्तर बातमी एकदा वाचा.

News18
News18
पनवेल : पनवेलमधून अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. जिथे तरुणाने आयुष्याला आकार देण्यासाठी तसेच भविष्याची स्वप्न सजवण्यासाठी नुकतीच सुरुवात केली होती.मात्र, एका चुकीमुळे त्याला स्वतःचाच जीव गमावला लागला. या अपघाताने तरुणाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
एक चूक अन् तरुणाचा जागीत अंत
मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव आदित्य अंकुश घरत असून तो मुळचा दिघोडे येथील रहिवासी होता. (मंगळवार) ४ नोव्हेंबर रोजी आदित्य बेलापूरकडून उरणच्या दिशेने स्कुटीने जात होता. मात्र, उलवे-वहाल ब्रिजवर पोहोचताच, त्याच्या स्कुटीचा वेग अत्यंत जास्त होता आणि त्याने हेल्मेटही घातलेले नव्हते. यामुळे स्कुटी रस्त्यावर घसरुन त्याचा अपघात झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
advertisement
मृत तरुणाचा विरोद्धात गुन्हा दाखल
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर अपघाताची सखोल चौकशी सुरू केली आहे. उलवे पोलिसांनी सांगितले की, ही घटना सर्व वाहनचालकांसाठी महत्त्वाचा धडा आहे. वेगाने वाहन चालवणे, हेल्मेट न घालणे आणि रस्त्याचे नियम न पाळणे फक्त स्वतःसाठीच नव्हे तर इतरांच्या जीवनासाठीही धोकादायक ठरू शकते.
advertisement
पोलिसांनी मृत तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. त्यांनी नागरिकांना सांगितले आहे की, रस्त्यावर वाहनांचा वेग वाढवणे, नियम मोडणे आणि हेल्मेट न घालणे गंभीर परिणाम निर्माण करू शकतात. हा अपघात जिवंत उदाहरण ठरतो की, रस्त्यावरील नियम पाळणे किती महत्त्वाचे आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Panvel Accident : तो घरी कधी परतणार नाही, बाईक चालवतना एक चूक अन 29 वर्षाच्या तरूणाचा जागीच मृत्यू
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement