IVF Process: बाळ तयार करून गर्भाशयात एंट्री, मुंबईतल्या हॉस्पिटलने करून दाखवलं, राज्यातला पहिलाच प्रयोग!

Last Updated:

गर्भधारणेसाठी अनेक कपल बाळ होण्यासाठी IVF प्रकियेचा वापर करतात. पण हीच प्रक्रिया सामान्य नागरिकांसाठी फार खर्चिक पडते. मुंबईच्या एका प्रसिद्ध रुग्णालायमध्ये या प्रक्रियेत कमी दरात उपचार केले जाणार आहेत.

सामान्य दाम्पत्यासाठी आशेचा नवा किरण, मुंबईतल्या प्रसिद्ध रूग्णालयात पहिल्यांदाच 'टेस्ट ट्यूब बेबी' प्रक्रिया
सामान्य दाम्पत्यासाठी आशेचा नवा किरण, मुंबईतल्या प्रसिद्ध रूग्णालयात पहिल्यांदाच 'टेस्ट ट्यूब बेबी' प्रक्रिया
मुंबई: अनेक असे जोडपे आहेत की, ज्यांच्या लग्नाला अनेक वर्षे झालेली आहेत, परंतु त्यांना बाळ होत नाहीये. गर्भधारणेसाठी त्यांना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. परंतु आता बदलत्या काळाप्रमाणे अनेक कपल बाळ होण्यासाठी IVF प्रकियेचा वापर करतात. पण हीच प्रक्रिया सामान्य नागरिकांसाठी फार खर्चिक पडते. त्यामुळे अनेकजण या प्रक्रियेचा साधा विचारही करत नाहीत. पण आता ह्याच प्रक्रियेचा सामान्य माणूस लाभ घेऊ शकणार आहे. या प्रक्रियेला 'टेस्ट ट्यूब बेबी' असं देखील म्हणतात. मुंबईच्या कामा अँड आल्बलेस हॉस्पिटलने राज्याच्या वैद्यकीय इतिहासात कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक जोडप्यांना याचा फायदा होणार आहे.
लग्नासाठी अनेक वर्षे होऊनही अनेक दाम्पत्यांना बाळ होत नाही. यांच्यासाठी आशेचा नवा किरण आता निर्माण झाला आहे. खरंतर, IVF प्रकिया ही गेल्या अनेक वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात आहे. परंतु ती प्रक्रिया फारच खर्चिक असल्यामुळे तिचा वापर सामान्य नागरिक किंवा अल्प उत्पन्न गटातील कुटुंब करत नव्हते. परंतु आता सामान्य नागरिकांच्या दृष्टीने ही आनंदाची बातमीच म्हणता येईल. राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांनाही आता मुंबईत येऊन या प्रगत उपचारांचा लाभ घेता येणार आहे. रुग्णालयाच्या IVF प्रयोगशाळेत यशस्वीपणे भ्रूण निर्मिती करण्यात आली असून, अशी कामगिरी करणारे हे महाराष्ट्रातील पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे.
advertisement
कामा हॉस्पिटलमध्ये ही प्रक्रिया कमी खर्चिक आणि परवडणाऱ्या दरात होणार आहे. नोव्हेंबर 2025 पासून ही प्रक्रिया या रुग्णालयात केली जात आहे. एआरटी (आसिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नोलॉजी) या तंत्रज्ञानाचा वापर करत ही सुविधा वापरली जात आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये या रुग्णालयाला एआरटी बँक स्थापन करण्याची मान्यता मिळाली होती. आता येथे दुसर्‍या टप्प्यातील अत्याधुनिक सेवाही सुरू झाली आहेत. या हॉस्पिटलच्या केंद्रात IVF आणि ICSI यांसारख्या आधुनिक उपचार पद्धती देखील उपलब्ध आहे. या केंद्रावर गरजूंना डोनर स्पर्म (शुक्राणू) आणि डोनर एग (अंडाणू) यांची सुविधा सुद्धा मिळेल. अंडाणू आणि शुक्राणूच्या सुरक्षितपणे साठवून ठेवण्यासाठी 'क्रायोपिझवेंशन' नावाची सोय सुद्धा करण्यात आली आहे. या सरकारी रुग्णालायत खासगी रुग्णालयात लागणारा लाखोंचा खर्च होणार नाही, सरकारी रुग्णालायत कमी दरात उपचार केले जाणार आहेत.
advertisement
कशी होते प्रक्रिया?
प्रक्रियेबद्दल रुग्णालायाचे अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी असे सांगितले की, सर्वात आधी तपासणी केली जाते. अंडाशय किंवा फॅलोपियन ट्यूबमधील अडथळे औषधोपचार करून ते दूर केले जातात. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होणे शक्यता असते. नैसर्गिकरीत्या यश न मिळाल्यास IVF प्रकिया राबवली जाते. यात प्रयोगशाळेत भ्रूण तयार करून तो महिलेच्या गर्भाशयात प्रत्यारोपित केला जातो, ज्याला सर्वसामान्य भाषेत 'टेस्ट ट्यूब बेबी' म्हटले जाते.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
IVF Process: बाळ तयार करून गर्भाशयात एंट्री, मुंबईतल्या हॉस्पिटलने करून दाखवलं, राज्यातला पहिलाच प्रयोग!
Next Article
advertisement
BMC Election Results MIM : बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उलटफेर
बीएमसीमध्ये ८ जागा जिंकल्यानंतर एमआयएमला मोठा जॅकपॉट, मुंबईच्या सत्ता समीकरणात उ
  • मुंबई महापालिकेची सत्ता भाजप-महायुतीने हिसकावली आहे.

  • एमआयएमने लक्षणीय कामगिरी करत मुंबईत ८ जागांवर विजय मिळवला.

  • मुंबईतील निवडणुकीतील या यशानंतर आता एमआयएमला मोठा जॅकपॉट लागला आहे.

View All
advertisement