advertisement

Online Fraud: मायाने मेसेज केला, म्हणाली फक्त 3 तास काम करा; आमिशाला भुलला अन् आयुष्याची कमाई गमवली

Last Updated:

घरबसल्या ऑनलाइन कामाची संधी देण्याच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी मेसेज केला. त्या मेसेजवर व्यक्तीने रिप्लाय केला. सायबर चोरट्यांच्या मेसेजला रिप्लाय दिल्यामुळे बँकेच्या अकाऊंटमधली अख्ख्या आयुष्याची कमाई गमावून बसला आहे.

Online Fraud: मायाने मेसेज केला, म्हणाली फक्त 3 तास काम करा; आमिशाला भुलला अन् आयुष्याची कमाई गमवली
Online Fraud: मायाने मेसेज केला, म्हणाली फक्त 3 तास काम करा; आमिशाला भुलला अन् आयुष्याची कमाई गमवली
सायबर चोरट्यांकडून वेगवेगळी आमिषे दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याचे सत्र सध्या सुरू आहे. शेअर बाजारात गुंतवणूक, घरातून ऑनलाइन कामाची संधी सोबतच कारवाईची भीती दाखवून चोरटे व्यक्तींची फसवणूक करतात. आता अशातच असाच काहीसा प्रकार ठाण्यामध्ये उघडकीस आला आहे. घरबसल्या ऑनलाइन कामाची संधी देण्याच्या नावाखाली एका व्यक्तीने मेसेज केला. मेसेज करून एका व्यक्तीच्या अकाऊंटमधली अख्ख्या आयुष्याची कमाई गमावून बसला आहे.
शहापूर तालुक्यातील आसनगावमध्ये राहणाऱ्या मधुकर पवार नावाच्या व्यक्तीला काही सायबर चोरट्यांनी लाखो रूपयांचा गंडा घातला आहे. मधुकर पवार (38) हे ठाण्यातील एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉबला आहेत. 16 सप्टेंबरला मधुकर जॉबवर असताना त्यांना एक मेसेज आला. हा मेसेज त्यांना टेलिग्राम अकाऊंटवरून आला होता. त्यांच्या टेलिग्राम अकाऊंटवर माया नावाच्या व्यक्तीने मेसेज केला होता. या मेसेजमध्ये मधुकर यांना पार्ट टाईम नोकरीसाठीचा मेसेज आला होता. या मेसेजला त्यांनी रिप्लाय दिला आणि झटक्यात तब्बल 13 लाख रूपये गायब झाले.
advertisement
मधुकर यांना माया नावाच्या अकाऊंटवरून पार्ट टाईम नोकरीचा मेसेज आला होता. त्यामध्ये दिवसाला एक ते तीन तास काम करून दीड ते अडीच हजार रूपये कमावता येतील, अशी माहिती होती. त्यांना पार्ट टाईम जॉबची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी या मेसेजला रिप्लाय केला. पण हाच रिप्लाय करणं मधुकर यांना महागात पडलं आहे. फ्रॉड मेसेजला रिप्लाय केल्यामुळे मधुकर यांच्या अकाऊंटमधून तब्बल 13 लाख 56 हजार रूपये गायब झाले. अकाऊंटमधून पैसे गहाळ होताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
advertisement
मधुकर पवार यांच्यासोबत घडलेल्या ऑनलाईन फ्रॉडचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राबोडी पोलिस सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी करीत आहे. दरम्यान, राबोडी पोलिस स्थानकांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती गुरूवारी पोलिसांनी दिली. गेल्या काही दिवसांपूर्वी अहमदाबादच्या इसानपूरमध्येही ऑनलाइन काम देण्याच्या बहाण्याने एका 43 वर्षीय महिलेची 3.4 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. या प्रकरणी इसानपूर पोलिसात FIR दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडियावर एका लिंकवर क्लिक केल्यानंतर या महिलेला हा अनुभव आला.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Online Fraud: मायाने मेसेज केला, म्हणाली फक्त 3 तास काम करा; आमिशाला भुलला अन् आयुष्याची कमाई गमवली
Next Article
advertisement
Explainer : प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरिकेला! पाहा नेमकं काय घडलं?
प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरि
  • प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचालनात केवळ भारताची लष्करी ताकद दिसली नाही

  • तर बदलत्या जगाचं नवं राजकारणही पाहायला मिळालं.

  • भारताने जगाला दिलेला एक मोठा 'जिओपॉलिटिकल मेसेज' होता.

View All
advertisement