Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात रावण पोलिसांच्या ताब्यात
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.
मुंबई, विशाल पाटील. प्रतिनिधी : शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळीबार (Firing) करण्यात आला आहे, या घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. मॉरिस नरोना नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर फेसबुक लाईव्ह सुरु असताना गोळ्या झाडल्या. घोसाळकरांवर गोळ्या झाडल्यानंतर मॉरिसने स्वतःवर देखील गोळ्या झाडून आत्महत्या केली.
या प्रकरणात आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. सुरुवातीला घटनास्थळी हजर असलेल्या मेहूल पारेख याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता रोहित शाहु उर्फ रावण याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात त्यांच्याकडून काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
advertisement
दरम्यान मॉरिस नरोना याने गुन्ह्यामध्ये जे शस्त्र वापरलं आहे, त्याबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मॉरिस भाईने गोळीबारात जे शस्त्र वापरलं आहे, ते अवैध शस्त्र असल्याचा संशय आहे. मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांकडून मॉरिसला शस्त्र परवाना देण्यात आलेला नाही. त्यामुळे मॉरिसने ज्या पिस्तुलामधून अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्या ते पिस्तूल अवैध असल्याचं बोललं जात आहे. मॉरिसकडे हे शस्त्र कुठून आलं, त्याला ते कसं मिळालं याचा आता पोलिसांकडून तपास केला जाणार आहे.
Location :
First Published :
February 09, 2024 9:00 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Abhishek Ghosalkar Firing : अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणात रावण पोलिसांच्या ताब्यात