Worli Hit and Run: "हिट अँड रन नव्हे, हा तर मर्डर" वरळी दुर्घटनेवर आदित्य ठाकरे बोलले...
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
"वरळीमध्ये घडलेली दुर्घटना भयानक आहे. ती हिट अँड रनची नव्हे, तर मर्डरची केस आहे. या प्रकरणाला पुढे कोर्टात चालवताना मर्डरची केस म्हणूनच चालवलं पाहिजे......
मुंबई: वरळी हिट अँड रन प्रकरण गेल्या काही दिवसांपासून राज्यात चांगलंच चर्चेत आहे. खरंतर पुणे हिट अँड रन प्रकरणाची चौकशी पूर्ण होते न होते तोवर असे धक्कादायक प्रकरण घडल्याने पोलीस आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहे. त्याचबरोबर मुंबई आणि पुणे या बड्या शहरांतील नाईट लाईफदेखील चर्चेत आली आहे. 7 जुलैला पहाटे वरळी परिसरात मद्यधुंद नशेत असलेला आरोपी मिहीर शाह आणि त्याच्या साथीदारांनी एक महिला आणि पतीला गाडीवरून उडवलं होतं. त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप आणि प्रत्यारोप देखील सुरू झाले.
हिट अँड रन नव्हे, हा तर मर्डर -आदित्य ठाकरे दरम्यान या दुर्घटनेवर आज वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी विस्तृत प्रतिक्रिया दिली आहे. "वरळीमध्ये घडलेली दुर्घटना भयानक आहे. ती हिट अँड रनची नव्हे, तर मर्डरची केस आहे. या प्रकरणाला पुढे कोर्टात चालवताना मर्डरची केस म्हणूनच चालवलं पाहिजे. आज जरी मुख्य आरोपी मिहीर शाहला अटक झाली असली तरी 60 तास हा मुख्य आरोपी मोकाट का होता? गृहमंत्री या संपूर्ण प्रकरणात काय करत आहेत? " असे सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केले.
advertisement
"नेमकं कोण कुणाला साथ देतं आहे, कोण कुणाला पाठिशी घालतं आहे?" असे सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी गृहविभाग पर्यायाने देवेंद्र फडणवीसांकडे बोट दाखवले आहे. तसेच अश्या प्रकरणात ब्लड सँपलची फेरफार हा एक चिंतेचा विषय मानला जातो, पुणे हिट अँड रन प्रकरणात त्याची आपण सर्वांना प्रचिती आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला मर्डरची केस म्हणूनट्रीट करा अशी आग्रही मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे.
advertisement
नेमकं काय घडलं? 7 जुलैच्या पहाटे नाखवा दाम्पत्य मच्छी खरेदी विक्रीच्या व्यवहारानिमित्त बाहेर पडलं. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर आणि त्याचे काही साथीदार लेट नाईट पार्टीवरून मद्यधुंद अवस्थेत परतत असताना या दाम्पत्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या अंगावर धडकेनंतर जाणूनबुजून गाडी चालवण्यात आली. आता या प्रकरणात अटकेची प्रक्रिया सुरू आहे. मुख्य आरोपीसह इतर 12 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी मिहीर शाहला शहापूरमधून नुकतीच अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर राज्यातील गृहखातं, पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर विरोधकांकडून तसेच जनतेतून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आता ही तपास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाखवा दाम्पत्याला न्याय कसा मिळतो, हे स्पष्ट होईल.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 09, 2024 6:01 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Worli Hit and Run: "हिट अँड रन नव्हे, हा तर मर्डर" वरळी दुर्घटनेवर आदित्य ठाकरे बोलले...


