Mumbai Crime: वडिलांनी मृत्यूपत्र लिहूनही कुटुंबातील वाद विकोपाला, लेकीने संपत्तीसाठी भावासाह वहिनीला कोर्टात खेचलं
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
वडिलोत्पार्जित जमीनीसाठी अनेकदा एकाच रक्ताचे नाते पक्के वैरी होतात. असा प्रकार मुंबईच्या बोरिवलीमध्ये घडली आहे.
सध्याच्या काळात अनेक जण आपल्या हयातीतच मृत्यूपत्र बनवण्याचं काम केलं जातं. स्वकमाईची आणि स्वत:च्या मालकीची, स्वत: खरेदी केलेली मालमत्ता आपल्या निधनानंतर योग्य व्यक्तीच्या हाती पडावी अशी आपली इच्छा असेल तर त्यासाठी मृत्युपत्र करणं हा सर्वांत सुरक्षित आणि चांगला मार्ग आहे. पण आता मुंबईमध्ये एका व्यक्तीने आपल्या हयातीत मृत्यूपत्र बनवूनही त्यांना काहीही फायदा झाला नाही. ज्या कारणासाठी मृत्यूपत्र बनवलं, शेवटी त्यांच्या निधनानंतर तेच झालं. बहिण- भावातील वाद इतका विकोपाला गेला की, शेवटी बहिणीनेच भावाच्या विरोधात पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
वडिलोत्पार्जित जमीनीसाठी अनेकदा एकाच रक्ताचे नाते पक्के वैरी होतात. असाच काहीसा प्रकार मुंबईच्या बोरिवलीमध्ये घडली आहे. बोरिवलीमध्ये एका व्यक्तीने दहा वर्षांपूर्वी आपले मृत्यूपत्र बनवले होते. आपल्या पश्चात मुलगा आणि मुलीमध्ये वाद नको म्हणून त्यांनी जीवंतपणीच मृत्यूपत्र बनवून ठेवले होते. शेवटी ज्याची भिती त्या व्यक्तीला होती, तेच झाले. मृत्यूपत्रानुसार वाटा न मिळाल्याने भावंडांमध्ये वाद झाला आण प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. सध्या अमेरिकेत आपल्या कुटुंबासोबत राहणाऱ्या 53 वर्षीय महिलेच्या वडिलांनी 2006 मध्ये आपले मृत्यूपत्र बनवून ठेवले होते. त्या मृत्यूपत्रात मुलासह मुलीलाही काय काय संपत्ती मिळावी, याची माहिती होती.
advertisement
53 वर्षीय महिलेचे वडील जहाज वाहतूक क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावरून सेवानिवृत्त झाले. त्यांनी हयात असताना 2006 सालीच एक कायदेशीर मृत्यूपत्र तयार करून ठेवलं होतं. त्यानंतर दहा वर्षांनी म्हणजेच, 2016 साली त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपत्रात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या पत्नीच्या मृत्यूनंतर दागिने आणि घरातील साहित्य मुलीच्या वाट्याला जाणार होते. जर, त्यांच्या पत्नीच्या आधीच मुलीचे निधन झाले तर, त्यांचे दागिने आणि घरातील साहित्य जावई आणि नातीला द्यावे, असे मृत्यूपत्रात नमूद करण्यात आले होते. इतके स्पष्टपणे सर्व काही नमूद असतानाही महिलेचा भाऊ आणि वहिनी दागिने व घरातील साहित्य देत नव्हते.
advertisement
वडिलांच्या निधनानंतर आई भावासोबतच राहत होती, त्यामुळे 53 वर्षीय महिला अनेक वर्षे काहीही बोलली नाही. मात्र एप्रिल 2024 मध्ये आईचेही निधन झाले. त्यानंतरही मृत्युपत्रात लिहून ठेवलेल्या वस्तू देण्यास टाळाटाळ केली जात होती. त्या महिलेने तिच्या भावाला मृत्युपत्राप्रमाणे दागिने आणि घरातील सामानाबाबत विचारणा केली असता भाऊ, वहिनी आणि भाचा या तिघांनीही आपल्याला काहीही माहिती नाही, असं उत्तर दिलं. मृत्यूपत्र करताना एग्झिक्युटर्स ठेवलेल्या दोघांच्याही बाब निदर्शनास आणून देण्यात आली. त्यांनीही महिलेच्या भावाला कायदेशीर नोटीस पाठवली. मात्र त्यावर कोणतेही उत्तर त्यांना मिळाले नाही.
advertisement
अखेर त्या 53 वर्षीय महिलेने तिच्या भावाविरूद्ध पोलीसांत जाण्याचा निर्णय घेतला. मृत्यूपत्रात लिहिलेल्या अटी शर्तींचा भंग करून सुमारे 70 लाख रूपयांचे दागिने, घरातील सामान आणि मृत्युपत्राची मूळ प्रत देत नसल्याची तक्रार करण्यात आली. या तक्रारीवरून बोरिवली पोलिसांनी महिलेच्या भावासह, वहिनी आणि भाचा यांच्यावर विश्वासघात आणि फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 4:42 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Crime: वडिलांनी मृत्यूपत्र लिहूनही कुटुंबातील वाद विकोपाला, लेकीने संपत्तीसाठी भावासाह वहिनीला कोर्टात खेचलं







