Akshay Shinde Encounter : अक्षयची 'गेम' करणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे कोण? झालं होतं निलंबन
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
अक्षय शिंदेने पोलिसांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. तेव्हा स्वसंरक्षणार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षाक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळ्या झाडल्या.
ठाणे : बदलापूरमध्ये शाळेत लहान मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन तळोजा कारागृहातून ठाण्याकडे आणत असताना अक्षय शिंदेने पोलिसांचे रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केला. यात सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे जखमी झाले. तेव्हा स्वसंरक्षणार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षाक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळ्या झाडल्या. यातली एक गोळी अक्षयच्या डोक्याला लागली. गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. यानंतर आरोपी अक्षय शिंदे आणि एपीआय नीलेश मोरे या दोघांनाही कळवा रुग्णालयात आणलं. तिथे अक्षय शिंदेला मृत घोषित करण्यात आलं.
अक्षय शिंदे याच्यावर गोळ्या झाडणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी याआधी माजी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असणाऱ्या प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केलं होतं. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षात काम करण्याचाही त्यांना अनुभव आहे. प्रदीप शर्मांच्या नेतृत्वाखाली काम करताना संजय शिंदे हे दाउद गँगविरोधातल्या मोहिमेतही सहभागी होते.
advertisement
प्रदीप शर्मा यांनी १९९० च्या दशतका दाऊद इब्राहिम आणि छोटा राजनच्या टोळ्यांमधील गुंडांना टार्गेट केलं होतं. दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला त्यांनी अटक केली होती. त्या पथकातही संजय शिंदे हे होते. याआधी संजय शिंदे यांनी मुंबई पोलिसात काम केलंय. बदलापूर बलात्कार प्रकरणी तपासात राज्य सरकारकडून स्थापन केलेल्या एसआयटी पथकातही ते आहेत.
advertisement
संजय शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. एका खून प्रकरणातील आरोपी विजय पालांडे हा पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला होता. पालांडेला पळून जायला मदत केली असा आरोप तेव्हा संजय शिंदे यांच्यावर होता. पालांडेच्या गाडीत संजय शिंदे यांचा गणवेश सापडला होता. त्यावेळी संजय शिंदे यांना निलंबित केलं होतं. पण २०१४ मध्ये मुंबई पोलिसात संजय शिंदे यांना पुन्हा कामावर घेण्यात आलं होतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 24, 2024 8:38 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Akshay Shinde Encounter : अक्षयची 'गेम' करणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे कोण? झालं होतं निलंबन


