Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक, राज्य सरकारची ऑफर जरांगे पाटील स्वीकारणार?

Last Updated:

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली.

ओबीसी आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण, मुख्यमंत्र्यांनी केलं आश्वस्त
ओबीसी आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण, मुख्यमंत्र्यांनी केलं आश्वस्त
मुंबई, 12 सप्टेंबर (ऋचा कानोलकर, प्रतिनिधी) : मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहावर मॅरोथॉन बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत सरकार जे प्रयत्न करतायत त्याची माहिती सर्वपक्षीय नेत्यांना देण्यात आली आहे. दरम्यान बैठकीसाठी आलेल्या संभाजीराजे छत्रपतींनी आरक्षणाविषयी रोखठोक भूमिका मांडली. मराठा आरक्षणावर सर्वपक्षीय बैठक घेण्याचं सरकारला उशिरा शहाणपण सुचल्याची टीका त्यांनी केली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परीषद घेत माहिती दिली.
काय म्हणाले मुख्यमंत्री?
काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आरक्षण आणि कुणबी समाजाचा दाखला याचं आंदोलन सुरू आहे. आज सर्वपक्षीय बैठक यासाठी आयोजित केली. सर्वपक्षीयांनी वेळ काढून उपस्थिती दर्शवली. सर्वांना धन्यवाद. ही बैठक तातडीनं घेण्याचं कारण हे उपोषण आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आरोग्याची, जीवाची चिंता सरकारला आहे. राज्यात कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. जातींमध्ये तेढ निर्माण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे.
advertisement
जेव्हा जेव्हा असे प्रसंग आले तेव्हा राज्यकर्त्यांनी, विरोधीपक्षांनी बैछका घेतल्या. सूचना दिल्या, निर्णय घेतले.. सुसंवादातून मार्ग निघतो. सर्वपक्षीयांनी ठराव पारित केला आहे. जरांगे पाटील यांच्या जीवाच्या दृष्टीने सर्वांनी विनंती केली, सरकार मागणवीर काम करतंय. कार्यवाही सुरू आहे, थोडा वेळ दिला पाहिजे. उपोषण मागे घेण्याचा ठराव सर्वपक्षीयांनी केला आहे. मी विनंती करतो जरांगे पाटील यांना सगळे तुमच्यासोबत आहेत. चीफ जस्टिस शिंदे साहेबांची कमिटी गठीत केली आहे.
advertisement
यात जरांगे पाटील किंवा त्यांचे तज्ञ येऊ इच्छित असतील तर ते येऊ शकतात. सगळे अपडेट मिळतील तेही सूचना देऊ शकतील. जे गुन्हे दाखल झाले ते मागे घेण्याची विनंती केली होती. सरकारनं ते मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, सूचना संबंधितांना दिल्यात. लाठीचार्जमध्ये दोषींवर कारवाई होत आहे. खाडे, आघाव आणि तिसरे अधिकारी यांचं निलंबन करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
advertisement
गृहमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांनी दिलगिरी व्यक्त केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत एकमत झालं आहे. सुप्रीम कोर्टात रद्द झालेलं आरक्षण कसं द्यायचं याचा विचार सुरू आहे. क्युरेटीव्ह पेटीशनवर काम सुरू आहे. कुठल्याही समाजाला नाराज न करता हे आरक्षण दिलं जावं यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. ज्या त्रुटी दाखवल्या त्यावर काम करणं यावर चर्चा झाली. इतर समाजासारख्या सुविधा मराठा समाजालाही मिळाव्या यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 3700 अधिक पदं निर्माण करण्याचं काम सरकारनं केलं आहे. नियुक्तया मिळत नव्हत्या तेही काम आपण केलं. जो निर्णय घेऊ तो कायद्याच्या चौकटीत टिकला पाहिजे. याची काळजी सरकार घेत आहे. सरकार पूर्णपणे आरक्षण देण्याबाबत सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
मराठी बातम्या/मुंबई/
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठक, राज्य सरकारची ऑफर जरांगे पाटील स्वीकारणार?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement